
केतूर(सोलापूर)ः महामारी कोरोनामुळे सुरू असलेल्या व वरचेवर वाढत असलेल्या लॉकडाउन व संचारबंदीची झळ आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे.परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाकही रूतले गेले आहे. ग्रामीण भागातील भरणारे आठवडी बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले आहे. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.
हेही वाचाः रक्तदानाचा आकडा गेला एक हजाराच्या वर
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते. करमाळा तालुक्यातील केम, केतूर, जेऊर, साडे, जिंती, कोर्टी आदी मोठ्या गावात आठवडा बाजार भरतो. या बाजारात शेजारील दहा गावाबरोबरच वाड्यावस्त्यांची सोय होते.
हेही वाचाः अक्कलकोटमध्ये उघडली सर्वच दुकाने
आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे व्यावसायिक त्यांची दुकाने लावतात. भाजीपाला, फळे, कापड, धान्य, चप्पल, कटलरी साहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या विक्रेत्यांनाही दोन पैसे पदरात पडतात. परंतु,गेल्या अडीच- तीन महिन्यापासून ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन असल्याने व वरचेवर ते वाढतच असल्याने छोट्या व्यावसायिकांची मात्र पंचायत झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांचे हाल सुरू झाले आहेत. व्यवसाय बंद असल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असून मात्र कमाईशिवाय घर खर्च चालवणे अशक्य होऊ लागले आहे. हे आणखी किती दिवस चालणार? हे मात्र कोणीही सांगू शकत नसल्याने अडचणीत भरच पडली आहे.
सध्या लॉकडाउनमध्ये थोडी सवलत दिल्याने शहरी भागातील सर्व व्यवहार जवळजवळ सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील आठवडे बाजारही सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.