esakal | रणजितसिंह मोहिते-पाटील यांची विधानपरिषदेवर निवड होणार का? 
sakal

बोलून बातमी शोधा

RanjitSingh Mohite-Patil

भाजप त्यांच्या संघटन चातुर्याचा कसा फायदा करून घेतो हे पाहावे लागणार आहे. भाजपकडे ग्रामीण भागातील चेहरा नाही. मोहिते-पाटलांच्या रूपाने तो पक्षनेतृत्वाला मिळालेला आहे. पक्ष त्याचा कसा उपयोग करून घेतो हे पाहावे लागणार आहे. 

रणजितसिंह मोहिते-पाटील यांची विधानपरिषदेवर निवड होणार का? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नातेपुते (सोलापूर) : कोरोना संसर्ग, लॉकडाउन या काळातही राजकीयदृष्ट्या विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुका लागल्यापासून तालुकावासीयांना आत्मविश्‍वास वाटत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी समक्ष कार्यकर्त्यांना भेटून व आपल्या कौशल्याने अनेक मतदारसंघात भाजपला अनुकूल भूमिका घेण्यास भाग पाडले होते. 

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... परराज्यातील कामगारांना घेऊन जाताना लालपरीत
भाजपच्या वाट्याला तीन जागा
 
विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणला. या बदल्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मंत्रिपद निश्‍चित होते. परंतु, बदलत्या राजकीय वातावरणामुळे त्यांना निवडणुकीनंतर एकही पद नव्हते; परंतु येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. एका जागेवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव निश्‍चित असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटात सध्यातरी त्यांच्या नावाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा 17 मे पर्यंत रद्द
तावडे, मुंडे, खडसे, बावनकुळे यांच्या नावाची चर्चा 

भाजपकडे 105 आमदार असून ते तीन जागी आपला उमेदवार सहज निवडून आणू शकतात. माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी यांच्या परिवारातील कोणाला ना कोणाला भाजपने सत्तेची पदे दिलेली आहेत. तसे, मोहिते-पाटलांना भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांची वर्णी निश्‍चित समजली जात आहे. 

युवकांमध्ये त्यांची वेगळीच क्रेझ 
रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गावपातळीपर्यंत संघटना बांधण्यासाठी, वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. विधानपरिषद व राज्यसभेवर अल्पकाळ काम करण्याची संधी मिळाली. या अल्प काळातही त्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी,

मोहिते-पाटलांच्या रूपाने भाजपकडे ग्रामीण भागातील चेहरा 
पंढरपूर- लोणंद रेल्वेमार्गासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. युवकांमध्ये विशेषतः त्यांची वेगळीच क्रेझ आहे. भाजप त्यांच्या संघटन चातुर्याचा कसा फायदा करून घेतो हे पाहावे लागणार आहे. भाजपकडे ग्रामीण भागातील चेहरा नाही. मोहिते-पाटलांच्या रूपाने तो पक्षनेतृत्वाला मिळालेला आहे. पक्ष त्याचा कसा उपयोग करून घेतो हे पाहावे लागणार आहे.  

go to top