महिला व बालकल्याण समितीचा ठरला "कारभारी'! 'हे' आहेत सात विषय समित्यांचे सदस्य

4congress_ncp_shivsena.jpg
4congress_ncp_shivsena.jpg

सोलापूर : महापालिकेतील सात समित्यांसाठी 63 सदस्यांच्या निवडी अंतिम झाल्या आहेत. त्यात आता भाजपकडे तीन समित्या ठेवून उर्वरित चार समित्यांमध्ये कॉंग्रेस, एमआयएम, शिवसेनेला प्रत्येकी एक आणि वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एक समिती देऊन सातही समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, भाजपच्या कल्पना कारभारी यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती तर डॉ. किरण देशमुख किंवा राजेश अनगिरे यांच्याकडे वैद्यकीय सहायता नि आरोग्य समितीची सूत्रे सोपविली जातील, अशी चर्चा आहे. 


राज्यात शिवसेना, भाजपची सत्ता असताना भाजपकडे चार तर शिवसेनेकडे तीन समित्यांचा कारभार होता. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असून सध्या राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडून सर्वच विषय समित्या ताब्यात घेण्यासाठी हे तिन्ही पक्ष राजकीय समिकरणांची जुळवाजुळव करतील, असा अंदाज होता. मात्र, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक खूपच कमी असल्याने भाजपला सोबत घेऊनच विषय समित्यांच्या निवडी सुलभ होतील, याचा अंदाज घेऊन आता बिनविरोधी निवडणुकीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना पत्र देऊन त्यासंदर्भात विचारणा केल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप त्यांच्याकडून काही उत्तर न आल्याने या निवडीचा पेच कायम आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस, शिवसेना, एमआयएमकडून कोणत्या समितीची मागणी होते आणि त्यावर एकमत होते का, त्याचीही उत्सुकता आहे. 


समित्यानिहाय सदस्य... 

  • (स्थापत्य समिती) 

राजश्री कणके, रवी कय्यावाले, नागेश भोगडे, श्रीनिवास रिकमल्ले, विठ्ठल कोटा, मनोज शेजवाल, अनुराधा काटकर, पुनम बनसोडे, किसन जाधव. 

  • (उद्यान समिती) 

अविनाश बोमड्याल, निर्मला तांबे, रामेश्‍वरी बिर्रू, मिनाक्षी कंपली, प्रथमेश कोठे, मंदाकिनी पवार, तौफिक हत्तुरे, नुतन गायकवाड, गणेश पुजारी. 

  • (विधी समिती) 

अंबिका पाटील, देवी झाडबुके, नागेश वल्याळ, अश्‍विनी चव्हाण, देवेंद्र कोठे, ज्योती खटके, विनोद भोसले, सुवर्णा जाधव, वहिदाबानो शेख. 


(वैद्यकीय सहायता नि आरोग्य) 
डॉ. किरण देशमुख, राजेश अनगिरे, अविनाश पाटील, संगिता जाधव, अनिता मगर, गुरुशांत धुत्तरगावकर, फिरदोस पटेल, वाहिदाबी शेख, नागेश गायकवाड. 

(शहर सुधारणा) 

  • नारायण बनसोडे, विजयालक्ष्मी गड्डम, राजश्री बिराजदार- पाटील, मेनका राठोड, भारतसिंग बडूरवाले, राजकुमार हंचाटे, प्रवीण हंचाटे, शहजीदाबानो शेख, आनंद चंदनशिवे. 
     

(कामगार व समाजकल्याण) 

  • अनिता कोंडी, मंगल पाताळे, विनायक विटकर, सोनाली मुटकिरी, सारिका पिसे, उमेश गायकवाड, नरसिंग कोळी, सुनिता शेटे, अजहर हुंडेकरी. 

 
(महिला व बालकल्याण) 

  • कल्पना कारभारी, सुरेखा काकडे, प्रतिभा मुदगल, वरलक्ष्मी पुरूड, मिराबाई गुर्रम, विनायक कोंड्याल, परविन इनामदार, ज्योती बमगोंडे, तस्लीम शेख 


महापालिकेचे सत्ताधारी कोण हेच समजेना 
राज्यातील सत्तेचे समिकरण बदलल्यानंतर महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी शक्‍यता होती. मात्र, त्याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित असतानाही त्यांची मने जुळली नसल्याची चर्चा आहे. त्याचाच अनुभव महापालिकेतही येत असून परिवहन सभापती निवडीवेळी शिवसेनेला कॉंग्रेसने मदत न केल्याने ही समिती भाजपकडे गेली. आता सर्व विरोधक एकत्रित येऊन भाजपला एकही समिती मिळू देणार नाही, अशी भाषा करणाऱ्या विरोधकांनी आता आम्हाला प्रत्येकी एक समिती द्या आणि तीन समित्या तुमच्याकडे ठेवा, अशी मागणी सत्ताधारी भाजपकडे करीत असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com