कोरोनाला हरविण्यात महिला अव्वल ! 4054 पैकी 3707 महिलांची कोरोनावर मात; शहरात आज 23 पॉझिटिव्ह

31Corona_20akola_2001_1_3.jpg
31Corona_20akola_2001_1_3.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील पाच हजार 843 पुरुषांना आणि चार हजार 54 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील पाच हजार 206 पुरुषांनी तर तीन हजार 707 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांमध्ये 184 महिला तर 366 पुरुषांचा समावेश आहे. आज 819 संशयितांमध्ये 14 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे आज 18 पुरुषांनी आणि 13 महिलांनी कोरोनावर विजय मिळवित घर गाठले.


ठळक बाबी...

  • शहरात आतापर्यंत एक लाख आठ हजार 866 संशयितांची कोरोना टेस्ट
  • एकूण टेस्टपैकी 98 हजार 969 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 897 कोरोना पॉझिटिव्ह
  • मृतांची संख्या 550; सध्या 434 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आतापर्यंत आठ हजार 913 रुग्णांनी केली कोरोनावर मात

शहरात आज होटगी रोडवरील मुलांचे वस्तीगृह येथे दोन, होटगी नाका, सुनिल नगर (एमआयडीसी रोड), जोशी गल्ली, बुधवार पेठ, कल्लप्पा म्हेत्रे वस्ती (विट भट्‌टीजवळ), भारत नगर, जुना संतोष नगर, उत्कृर्ष नगर, कमला नगर (विजयपूर रोड), नितीन नगर, उषा अपार्टमेंट (रामलाल चौक), कुमठा नाका, सर्वोदय हौसिंग सोसायटी, धमश्री लाईन (मुरारजी पेठ), शिवाजी नगर (मोदी चर्चजवळ) येथे प्रत्येक एका रुग्णाची भर पडली आहे. दुसरीकडे म्हेत्रे वस्ती (प्रताप तांडाजवळ) दोन आणि गुरुनानक चौक (तुालका पोलिस स्टेशनजवळ) तीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 100 संशयित होम क्‍वारंटाईन असून 36 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. 23 जण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com