esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Visarjan Kund

तलावातील पाणी अस्वच्छ होणार नाही, याची दक्षता घेत महापालिकेने तलाव परिसरात कायमस्वरूपी विसर्जन कुंड बांधणीस मंजुरी दिली. मात्र, त्याच्या कामाला सुरवात झालेली नव्हती. यंदा गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असून, विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरीही तलाव परिसरात झालेल्या विसर्जन कुंडामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

महापालिकेचा अजब कारभार! तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेला विसर्जन कुंड आता झाला पूर्ण 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतून 2017 मध्ये धर्मवीर संभाजीराजे तलावात विसर्जन कुंड बांधण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाली. तरीही सुरू न झालेले काम आता 15 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी पाच लाखांहून अधिक खर्च झाला आहे. 

हेही वाचा : अर्रार्र! पोलिसांनाच पडला हद्दीचा प्रश्‍न; जुगारावरील कारवाईदरम्यान इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू 

तलावातील पाणी अस्वच्छ होणार नाही, याची दक्षता घेत महापालिकेने तलाव परिसरात कायमस्वरूपी विसर्जन कुंड बांधणीस मंजुरी दिली. मात्र, त्याच्या कामाला सुरवात झालेली नव्हती. यंदा गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असून, विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरीही तलाव परिसरात झालेल्या विसर्जन कुंडामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पाच लाखांचा खर्च करून लोखंडी दरवाजे लावून तो कुंड पूर्ण करण्यात आला आहे. दरवर्षी तलावाची डागडुजी करण्यापेक्षा हा कुंड कायमस्वरूपी होईल, असा विश्‍वास महापालिका प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. दरम्यान, तलावात विसर्जन कुंड उभारणे, त्याची दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी महापालिकेला मोठा खर्च करावा लागत होता. आता मात्र तो प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. 

हेही वाचा : विठ्ठल मंदिर आंदोलनावर बहुजन वंचित आघाडी ठाम; ऍड. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन 

दुसऱ्या कुंडाचेही काम घेतले हाती 
दहा लाख रुपयांचा खर्च करून धर्मवीर संभाजीराजे तलावात दोन विर्सजन कुंड बांधले जात आहेत. त्यापैकी एका कुंडाचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱ्या कुंडाचेही काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक कुंडाची क्षमता सुमारे 50 हजार लिटर पाणी मावेल एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने एकाच कुंडाच्या बांधकामासाठी परवानगी दिलेली असताना दुसऱ्या कुंडाचे काम कसे सुरू झाले, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

तलावांबाहेर महापालिकेचे लागले फलक 
शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तथा संसर्ग होऊ नये, या हेतूने यंदा सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती श्रीगणेश मूर्तींचे विर्सजन करण्यास सक्‍त मनाई असल्याचे फलक श्री सिद्धेश्‍वर तलाव आणि विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजीराजे तलावाबाहेर लावण्यात आले आहेत. नागरिकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करावे, तलावात विर्सजन करू दिले जाणार नाही, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तलाव परिसरात महापालिकेचे स्वतंत्र कर्मचारी आणि पोलिस अधिकारी व कर्मचारीही नियुक्‍त करण्यात येणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top