सकाळ इम्पॅक्‍ट : धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी वर्क ऑर्डर निघाली, पावसाळ्यानंतर प्रारंभ 

प्रमोद बोडके 
Friday, 14 August 2020

केंद्र सरकारच्या माध्यमातून सात कोटी व राज्य सरकारच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नॅशनल प्लॅन फॉर कॉंझर्वेशन ऑफ ऍक्वॉटिक इको सिस्टिम अंतर्गत पर्यावरण विषयक ड्रेजिंग काम केले जाणार आहे. त्यासाठी सात कोटी 85 लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता संतुलित राखण्यासाठी 16 लाख 54 हजार रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावाच्या पायाभूत सुविधांचे काम करण्यासाठी 94 लाख 24 हजार रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. 

सोलापूर : सोलापुरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी "सकाळ'च्या वतीने वारंवार करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मूर्त स्वरूप मिळू लागले आहे. तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या बारा कोटी रुपयांच्या निधीतून कामाच्या वर्कऑर्डर निघाल्या आहेत. पावसाळ्यानंतर या तलावाच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

हेही वाचा : सावधान..! मोहोळ शहराजवळच दिसला बिबट्या; नागरिकांना खबरदारीचा इशारा 

केंद्र सरकारच्या माध्यमातून सात कोटी व राज्य सरकारच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नॅशनल प्लॅन फॉर कॉंझर्वेशन ऑफ ऍक्वॉटिक इको सिस्टिम अंतर्गत पर्यावरण विषयक ड्रेजिंग काम केले जाणार आहे. त्यासाठी सात कोटी 85 लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता संतुलित राखण्यासाठी 16 लाख 54 हजार रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावाच्या पायाभूत सुविधांचे काम करण्यासाठी 94 लाख 24 हजार रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. या निविदा काढून संबंधित ठेकेदारांना वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा : सावधान..! "वीर'मधून 23 हजार क्‍युसेकचा विसर्ग; "या' नदीकाठच्या लोकांना पात्रात न जाण्याचा इशारा 

याबाबत महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, सध्या पाऊस असल्याने या कामाचा शुभारंभ करणे कठीण आहे. या कामासाठी निधी उपलब्ध आहे. या कामाच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. सध्या तलावातील जलपर्णी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

उपमहापौर राजेश काळे म्हणाले, सोलापुरातील महत्त्वाचा तलाव म्हणून छत्रपती संभाजी तलावाकडे पाहिले जाते. या तलावाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी "सकाळ'च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आमदार सुभाष देशमख यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला आहे. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून "सकाळ'च्या वतीने तलावाच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work order issued for beautification of Dharmaveer Sambhaji Lake