esakal | भीमा कारखान्याचा तिढा वाढला, राजकीय आरोप-प्रत्यारोप 
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा कारखान्याचा तिढा वाढला, राजकीय आरोप-प्रत्यारोप 

सुधाकर परिचारकांचे आश्‍वासन 
दरम्यान, "भीमा'चे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी या अडचणीबाबत सहकारमंत्र्यांशी बोलतो व त्यावर काही मार्ग निघतो का ते पाहतो, तसा तुम्हाला निरोप दिला असल्याचे कामगारांना सांगितले. एकंदरीत एवढे दिग्गज येऊन बैठक निष्प्रभ झाल्याची चर्चा तहसील आवारात होती. दरम्यान, कारखान्याचे 17 संचालक आहेत. अनिल गवळी वगळता एकाही संचालकाने कामगारांच्या उपोषणस्थळाला भेट दिली नाही. 

भीमा कारखान्याचा तिढा वाढला, राजकीय आरोप-प्रत्यारोप 

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. या उपोषणास मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली. कामगारांच्या अडचणीवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याऐवजी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांचा राजीनामा मागितला. त्यामुळे कामगारांचा मूळ प्रश्‍न बाजूला ठेवत यात राजकारणाचा शिरकाव झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान, समन्वयासाठी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आयोजित केलेली बैठक निष्प्रभ ठरली. 

हेही वाचा - ठाकरे सरकारचा सिद्धेश्‍वर कारखान्याला दिलासा 

भीमा कारखान्याच्या कामगारांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी कामगारांची भेट घेतली. तर यावर तोडगा निघावा यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या दालनात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरू असताना राष्ट्रवादीचे जालिंदर लांडे यांनी वारंवार कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी राजीनामा द्यावा व कामगारांच्या उपोषणात सामील व्हावे, असा सूर लावला व टीकेचे लक्ष्य केले. हा सर्व प्रकार इतर मान्यवर पाहात होते. 

हेही वाचा - भाजपचा एक खासदार कमी होणार 

दरम्यान, उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी "हम भी कुछ कम नही' हे दाखवून देत बैठकीला उपस्थित असणारे आमदार यशवंत माने यांना आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहात. या अगोदरच्या शासनाने कारखान्यासाठी दिलेल्या थकहमीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे, ती उठवावी व एनसीडीसीच्या कर्जाचा मार्ग मोकळा करून शेतकऱ्यांची अडचण सोडविण्याचे आवाहन केले. माझ्या राजीनाम्याने प्रश्‍न सुटत असेल तर मी राजीनामा देईन. पुढल्या वर्षी याच दिवसात कारखान्याची निवडणूक आहे. त्यावेळी आपण रीतसर निवडून या असा सल्लाही जगताप यांनी यावेळी लांडे यांना दिला. 
दरम्यान, उपोषणार्थी कामगारांशी संवाद साधला असता, आमदार माने यांनी सोमवारी साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करू, असे सांगितले आहे. त्यावर सकारात्मक तोडगा निघाला तर ठीकच अन्यथा उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कामगार प्रतिनिधी हनुमंत चव्हाण यांनी सांगितले.

go to top