#Coronavirus : घरात कोंडून ठेवलं नाही, वेळेचा सदुपयोग करा..!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कामाच्या निमित्ताने माझा महिन्यातून 15-20 दिवसांचा प्रवास ठरलेला असतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठ दिवस कंपनी बंद राहणार आहे. या काळात घरात थांबून राहून वैयक्तिक कामे करण्याचा विचार आहे. वाचनाला वेळ देणार आहे. घरातल्या जिममध्ये अधिकाधिक वेळ घालवणार आहे. 
- यतीन शहा, 
चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने आपल्याला घरात कोंडून ठेवले आहे, असा विचार मनात न आणता सर्वांनी या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ द्यावा. सर्वांनी घरातच थांबावे. काही काम नसताना बाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्‍यात घालू नये, असे प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे चेअरमन यतीन शहा यांनी सांगितले. 

व्हिडिओ पाहा..​

"सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी यतीन शहा बोलत होते. प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीच्या 70 ते 80 टक्के मालाची निर्यात होते. आम्ही चायना, रशिया, युरोप यासह परदेशात जिथं जिथं माल पाठवतो, तिथेही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपन्या बंद आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीने 31 मार्चपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे जवळपास 1600 कामगार घरीच राहणार आहेत, असे सांगून श्री. शहा म्हणाले, "काम बंद ठेवल्याने सर्वांना त्रास होत आहे, पण ते गरजेचे आहे. 15 ते 20 दिवस काम बंद ठेवून आपण सर्वांनी घरामध्ये थांबणे गरजेचे आहे. सध्याची स्थिती पाहता लोक कोरोनाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आजही रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे. रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी पाच वाजता काही लोकांनी जल्लोष केला, हे चुकीचे आहे. युरोपमध्ये आलेली स्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.' 

कामाच्या निमित्ताने माझा महिन्यातून 15-20 दिवसांचा प्रवास ठरलेला असतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठ दिवस कंपनी बंद राहणार आहे. या काळात घरात थांबून राहून वैयक्तिक कामे करण्याचा विचार आहे. वाचनाला वेळ देणार आहे. घरातल्या जिममध्ये अधिकाधिक वेळ घालवणार आहे. 
- यतीन शहा, 
चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yatin shah interview