गुड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे

गुड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे
Updated on
सोलापूर : परदेशातून यवतमाळ येथे आलेल्या 14 पैकी तीन रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. तिन्ही रुग्णांची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर 10 डॉक्‍टरांच्या पथकाने उपचार सुरु केले. आता तिन्ही रुग्ण बरे झाले असून त्यांना 14 दिवसांसाठी घरी थांबण्याच्या सूचना केल्या असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. या पथकात पोखरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील डॉ. अच्युत भास्कर नरुटे यांचा समावेश आहे.



केंद्र व राज्य सरकारने केलेल्या लॉकडाउनमुळे आता कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत होऊ लागली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांना बरे करण्यासाठी एमडी मेडिसिन करणाऱ्या डॉक्‍टरांसह तज्ज्ञ डॉक्‍टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. चीन, अमेरिकेसह युरोपियन देश आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याबाबत पोखरापुरचे (ता. मोहोळ) असलेले डॉ. नरुटे हे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांनी सकाळशी बोलताना अनुभव सांगितले.




कोरोनाबाधितांकडून घेतले जाते प्रतिज्ञापत्र
देशातील डॉक्‍टरांच्या अथक परिश्रमातून कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका रुग्णाला डायबेटीस, ब्लडप्रेशर असतानाही तो बरा झाला आहे. डॉ. चंद्रशेखर दुर्वे, डॉ. बाबा येलके यांच्या नेतृत्वाखाली 10 डॉक्‍टरांच्या टीमने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. पुढील 14 दिवस स्वत:च्या घरात कोणाच्याही संपर्कात न येता सुरक्षित राहीन, असे त्यामध्ये नमूद केले जाते. त्याच्यावर पोलिस, डॉक्‍टरांची नजर असते.



अशी केली जाते कोरोनाबाधितांची तपासणी
सर्दी, ताप, खोकला, घसा दुखतो अथवा श्‍वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहीली जाते. त्यानंतर त्याच्या घशातून लाळीचा नमुना तपासणीसाठी पाठविला जातो. त्याचवेळी त्याच्या नाकातूनही एक नमुना घेऊन तोही तपासणीसाठी पाठविला जातो. ते नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णांवर उपचार केले जातात. पुढील 14 दिवसानंतर त्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले जातात. दरम्यान, रुग्णाच्या नाडीचे ठोके, ब्लडप्रेशर, छातीत निमोनियाची लक्षणे आहेत का, याची वारंवार तपासणी केली जाते. 14 दिवसानंतर त्याचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्याला काही दिवसांत डिस्चार्ज दिला जातो. तत्पूर्वी, 24 तासांच्या अंतराने त्या रुग्णांच्या दोन तपासण्या पूर्ण केल्या जातात.


आई-वडिल दररोज दोनवेळा करतात कॉल
डॉ. अच्यूत नरुटे हे यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमडी मेडिसीन पदवीचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या टिममध्ये त्यांचा समावेश आहे. कोरोना हे वैश्‍विक संकट असल्याने त्याची अनेकांमध्ये भिती आहे. त्यामुळे माझे आई- वडिल दिवसांतून दोनवेळा कॉल करुन प्रकृतीची विचारपूस करतात. मात्र, कोरोनाला हद्दपार करण्यात तुझा महत्त्वाचा सहभाग असावा, अशी प्रेरणाही त्यांनी सातत्याने दिली. त्यामुळे मला या वैश्‍विक संकटाचा मुकाबला करण्याचे बळ मिळाले, असेही डॉ. नरुटे यांनी सांगितले. कोरोनावर यशस्वी उपचार होत असून त्यासाठी डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची मेहनत खूप मोठी आहे. त्यामुळे हा विषाणू काही दिवसांत देशातून हद्दपार होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com