congress.jpg
congress.jpg

इंदापूर : आमदार भरणे यांना धक्का माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आघाडीवर | Election Results 2019

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर विधानसभा मतदार संघात भरणे विजयी होणार की हर्षवर्धन पाटील बाजी मारणार यासंदर्भात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैंजा लागल्या आहेत. मतमाेजणी सुरु झाली असून,  हर्षवर्धन पाटील यांनी 813 मतांनी आघाडीवर आहेत, तर भरणे पिछाडीवर गेले आहेत.

दरम्यान, दोन्हीं बाजूंनी विजयाची जय्यत तयारी करण्यात आली  आहे. कार्यकर्त्यांनी आगाऊ गुलाल व फटाक्यांची ऑर्डर सुद्धा दिली आहे. त्यामुळे जनादेश कोणास आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात चवीने चर्चा सुरू आहे. 

मागील विधानसभा निवडणूक सन 2009 मध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या लढतीत हर्षवर्धन पाटील यांनी सुमारे 8 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्याचा वचपा मामांनी 2014 मध्ये सुमारे 15 हजार मतांनी भाऊंचा पराभव करून घेतला.

विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक म्हणजे साडे तेरा कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला, तर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, खडकवासला, वीर भाटघरचे पाणी तालुक्यात आले नाही. शेटफळ-हवेली तलाव व मदनवाडी ते तरंगवाडीपर्यंतचे तलाव कोरडे पडले. त्यामुळे तालुक्याचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, त्यामुळे तालुक्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून तालुक्याचा विकास फक्त हर्षवर्धन पाटील सत्ताधारी भाजपच्या माध्यमातून शंभर टक्के करू शकतात त्यामुळे हर्षवर्धन पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन राज्य मंत्रिमंडळात पुन्हा निश्चित काम करतील असा विश्वास प्रचारप्रमुख ऍड. कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केला.

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे तसेच मिठाईची ऑर्डर दिली असून, जो उमेदवार जेव्हढ्या मताने विजयी होईल, तेवढे पैसे देण्याच्या पैजा लावल्या आहेत. त्यामुळे मामा पुन्हा विजयी होणार की भाऊ मैदान मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com