गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा निर्मलवारी पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे.

पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्नास हजार रुपये, स्मृतीचिन्ह देऊन सोहळाप्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांचा गौरव केला.

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात पैठण तालुक्‍यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडी ही गेल्या तीस वर्षांपासून पायी चालत येते. पैठण ते पंढरपूर पालखी सोहळा निघाल्यापासून या दिंडीने नियमांचे काटेकोरपणे पालन करून वृक्षारोपण केले. पायी वारीदरम्यान स्वच्छता, आरोग्य, नियोजन या गोष्टींना वारकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे सोहळा प्रमुख रघुनाथमहाराज गोसावी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurudatta Prasadik Dindi Nirmalwadi Award