#SaathChal प्रांत, भाषेपलीकडचा विठ्ठलमय सोहळा

सचिन शिंदे
Saturday, 21 July 2018

पिराची कुरोली (जि. सोलापूर) - तुका म्हणे धावा... पंढरी आहे विसावा, अशी आर्त हाक देत तोंडले बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा धावा भक्तिमय वातावरणात झाला. पंढरीच्या ओढीने धावलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. याच सोहळ्यात चार वेगवेगळ्या राज्यांतील सुमारे दोनशे वारकऱ्यांच्या दिंडीने लक्ष वेधले. प्रांत व भाषेपलीकडच्या या सोहळ्यात सारे विठ्ठलमय होऊन सहभागी झाले होते.

बोरगावचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बाराच्या सुमारास तोंडले बोंडलेच्या अलीकडे उतारावर पोचला. चोपदारांनी चोप उंचावल्यानंतर सोहळा थांबला. धाव्याचा अभंग झाला. ‘तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा’, म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने धावले. भक्तिमय वातावरणात झालेल्या सोहळ्यात रथापुढील १९ क्रमांकाच्या दिंडीने लक्ष वेधले, ते त्यांची वेशभूषा व भाषेमुळे. लातूर येथील उत्तम महाराज नळगीकर यांच्या या दिंडीत तेलंगण, आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्रातील दोनशे वारकऱ्यांचा सहभाग आहे. 

दिंडीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तेलगंणातील मदनूर येथील कौशल्या सूर्यवंशी या सत्तरी ओलांडलेल्या आजी. चारही विवाहित मुली व त्यांच्या कुटुंबीयासह त्या दिंडीत सहभागी आहेत. हे कुटुंब गेली वीस वर्षे वारी करते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ते दहा वर्षांपासून येतात. यापूर्वी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत. दिंडीचे पखवाजवादक नामदेव सूर्यवंशी मूळचे तेलंगणचे आहेत. दिंडीतील लोकांना मराठी चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही, मात्र संताचेअभंग तोंडपाठ आहेत. दिंडीत चालताना वेगवेगळ्या प्रांतातील वारकऱ्यांनी एका सुरात म्हटलेले अभंग भाषा, प्रांतापलीकडे पोचलेल्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari sant tukaram maharaj