सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून मोहोळमध्ये चोरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

शहरातील भरवस्तीमध्ये मेनरोडवर श्री शारदा ज्वेलर्स हे शिवाजी वामनराव गायकवाड यांचे व अमोल ज्वेलर्स हे पंडीत यांचे सोन्या चांदीचे दुकाने आहेत. रविवार येथे मोहोळचा बाजाराचा दिवस असतो. रविवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास दुकानमालक शटरची सर्व कुलपे व्यवस्थीत लावुन घरी गेले होते.

मोहोळ (सोलापूर) : येथील मेनरोडवरील आंबेडकर चौकातील दोन सोनाराच्या दुकानांचे शटर उचकटुन रविवारी (ता. २९) मध्यरात्री चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भरवस्तीमध्ये मेनरोडवर श्री शारदा ज्वेलर्स हे शिवाजी वामनराव गायकवाड यांचे व अमोल ज्वेलर्स हे पंडीत यांचे सोन्या चांदीचे दुकाने आहेत. रविवार येथे मोहोळचा बाजाराचा दिवस असतो. रविवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास दुकानमालक शटरची सर्व कुलपे व्यवस्थीत लावुन घरी गेले होते. सोमवारी (ता. ३०) सकाळी दुकानाची शटरची समोरील पट्टी उचकटल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सबंधित दुकानमालकांना फोन करून ही माहीती दिली. दुकानाजवळ येताच दुकान मालकांना दुकाने फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत मोहोळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून घटनास्थळांची पाहणी केली. तेव्हा दुकानांच्या कुलुपांना लावणाऱ्या लोखंडी पट्टया छन्नी व हातोड्याच्या साह्याने तोडुन चोरटयांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडे उलटी फिरवून चांदीच्या वस्तु, डी.व्ही.डी आदीची चोरी झाल्याचे दुकानमालकाकडुन प्राथमिक माहितीतुन सांगण्यात आले.
साधारणतः ३ ते ४ किलो चांदीच्या वस्तु चोरीस गेल्याचा अंदाज आहे. चोरीची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे. भर वस्तीत मेनरोडवरच चोरी झाल्यामुळे मोहोळमधील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: मोहोलमध्ये दोन सोन्याच्या दुकानात चोरी