पलूस तालुक्‍याला 1 हजार 168 कोरोनामुक्त

संजय गणेशकर 
Saturday, 26 September 2020

पलूस तालुक्‍यातील एकूण 1 हजार 694 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही पलूस तालुक्‍यासाठी दिलासादायक बाब आहे. आज तालुक्‍यात कोरोनाचे 19 रुग्ण सापडले. 

पलूस : पलूस तालुक्‍यातील एकूण 1 हजार 694 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही पलूस तालुक्‍यासाठी दिलासादायक बाब आहे. आज तालुक्‍यात कोरोनाचे 19 रुग्ण सापडले. 

पलूस तालुक्‍यात दररोज कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असले तरी दररोज कोरोनामुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये जवळजवळ 90 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यांना सर्दी, खोकला, ताप असे आजार नाहीत. 

बहुतांश रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येत आहे. आतापर्यंत पलूस तालुक्‍यात कोरोनाचे 1 हजार 694 रुग्ण सापडले. यांपैकी 1 हजार 168 रुग्ण बरे झाले आहेत. पलूस तालुक्‍यात आज दिवसभरात 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

आज पुणदी- 2, बुर्ली- 3, चोपडेवाडी- 2, मोराळे-3, पलूस -4, बांबवडे, खंडोबाचीवाडी, आमणापूर, भिलवडी व आंधळी या गावांमध्ये प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. सध्या तालुक्‍यात 471 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पलूस कोविड सेंटरमध्ये 5 रुग्ण उपचाराखाली, तर होम आयसोलेशन असे 433 रुग्ण आहेत. इतर कोविड सेंटरमध्ये 33 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. रागिणी पवार यांनी दिली. 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 thousand 168 corona free to Palus taluka