esakal | 'DCBI'ची धडक कारवाई; रायबागेत 10 किलोचे चंदन जप्त, एकजण अटकेत I Crime
sakal

बोलून बातमी शोधा

'DCBI'ची धडक कारवाई; रायबागेत 10 किलोचे चंदन जप्त, एकजण अटकेत

'DCBI'ची धडक कारवाई; रायबागेत 10 किलोचे चंदन जप्त, एकजण अटकेत

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : चंदनाची झाडे तोडून विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असल्यांचा पर्दाफाश करून ९० हजाराचे चंदन पोलिसांनी आज (२९) जप्त केले. रायबाग तालुक्यामधील बेक्केरी गावात 'डीसीआयबी' पथकाने कारवाई करून १० किलो ५ ग्रॅम चंदन जप्त केले आहे. पोलिसांतर्फे छापा घालण्यात येताना तिघांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु दोघे फरार झाले. पण, एका पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: बेळगाव - निवडणुक संपली; आता वेध अध्यक्ष निवडीची

रायबाग पोलिस ठाण्याच्या कार्यकक्षेतात बेक्केरी गाव आहे. याठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी सुमारे ९० हजाराचे चंदन जप्त करण्यात आले आहे. बेक्केरीत रात्री चंदानाची झाडे तोडून विक्रीसाठी नेण्याची तयारी सुरु असल्याबाबतची खात्रीलायक माहिती डीसीआयबी विशेष पथकाकडे आली होती. त्यामुळे पथक स्थापन करून छापा घातला. संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण रात्री अंधाराचा फायदा घेऊन तेथून दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. संशयिताकडून सुमारे साडेदहा किलो चंदन जप्त केले आहे. बाजारभावानुसार सुमारे ९० हजार जप्त केले.

हेही वाचा: हृदयाला आजारांपासून दूर ठेवायचंय; मग रोज प्या 'हा' चहा

बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीआयबी पथकाने कारवाई केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पाटीलसह हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. गायकवाड, टी. के. कोळची आदी सहभागी होते. दरम्यान, प्रकरणाची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झालेली आहे.

loading image
go to top