ते 11 जण फिल्मी स्टाईलने मारायला गेले स्टंट परंतू....

11 arrested for tribute of 10 lakhs in chikodi belgaum marathi news
11 arrested for tribute of 10 lakhs in chikodi belgaum marathi news

चिक्कोडी (बेळगाव) : चिक्कोडी उपविभाग हद्दीतील चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जोडकुरळी येथील मुत्तेप्पा पोन्नाप्पा पुजेरी यांचा जावई सिध्दाप्पा रामाप्पा खद्दी याचे अपहरण करुन त्याची सुटका करण्यासाठी 10 लाखाची खंडणी मागणाऱ्या संशयित 11 आरोपींना चिक्कोडी पोलिसांनी अटक केली.

संशयितांची नावे...
संजू हनमंत ओलेकार (रा. हारुगेरी, ता. रायबाग), यशवंत अशोक चलवादी (रा. रायबाग), श्रीधर रामचंद्र माळी (रा. हिडकल), करेप्पा मायाप्पा गड्डी (रा. हारुगेरी, ता. रायबाग), कल्मेश मायाप्पा कुरी (रा. हारुगेरी, ता. रायबाग), शेखर द्यामप्पा होलदवर (रा. हारुगेरी, ता. रायबाग), मंजू हनमंत ओलेकार (रा. कुडची, ता. रायबाग), लगमान्ना शंकर खद्दी (रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) यल्लाप्पा सिद्राम दुग्गानी (रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी), विठ्ठल बिराप्पा यड्रावी (रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी), सावंत मारुती सौंदत्ती (रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर अपहरणासाठी त्यांनी वापरलेली क्रुझर (केए 29 एम 3782) हे अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा-  COVID-19 धक्कादायक : कोरोना संशयित डॉक्टरांचेच नमुने पाठवण्यास शल्य चिकित्सकांची टाळाटाळ...
18 मार्च 2020 रोजी रात्री 8.30 वाजता 10 लाख रुपयाच्या खंडणीसाठी सिध्दाप्पा खद्दी यांचे संशयितांनी क्रुझर वाहनातून अपहरण केले होते. त्यांचे सासरे मुत्तेप्पा यांनी या प्रकरणी चिक्कोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडीचे पोलिस उपाधिक्षक मनोज कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, चिक्कोडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राकेश बगली, कर्मचारी एस. एम. चौगुला, ए. एम. मेंडिगेरी, आर. जी. भोसले, आर. एस. मुडलगी, के. व्ही. चेल्लीकेरी, एन. एस. बडिगेर, सचिन चौगुला, एस. के. कोलकार, टी. के. कोट्रे, बी. एल. होसट्टी यांनी या प्रकरणाचा तपास लावला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com