
नगर : महापालिकेच्या सावेडीतील प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी संस्थेला चालविण्यास देण्यासाठी फेरनिविदा काढण्यात येत आहे. यापूर्वी काढलेल्या निविदेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निविदेतील अटी शिथिल करून फेरनिविदा काढण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने 11 वर्षे मोफत चाललेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून महापालिका उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधत आहे. त्यामुळे महापालिकेचे स्पर्धा केंद्र व्यावसायिक होण्याची शक्यता आहे.
हे वाचा या शाळेच्या सहलीच्या बसला अपघात
महापालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते त्या वेळी महापालिकेची स्थिती चांगली होती. जकातकराच्या रूपात महापालिकेला मोठा आधार होत होता. त्यामुळे महापालिका जनसामान्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवीत होती. मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, महापौर केसरी स्पर्धा, असे अनेक उपक्रम महापालिकेकडून राबविले जात होते; मात्र, जकात गेली, त्यापाठोपाठ "एलबीटी'ही गेला. आता नवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला आहे. यात महापालिकेला थेट उत्पन्नाची साधने कमी झाली आहेत. मालमत्ताकर हेच एक उत्पन्नाचे प्रमुख साधन उरले आहे.
येथे क्लिक करा महाराष्ट्राच्या जेरूसलेमध्ये नाताळ उत्सव
"जीएसटी'च्या रूपात महापालिकेला मिळणारे उत्पन्न महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगारासही पुरत नाही. उद्यानांची स्थितीही दयनीय आहे. महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या अनेक जागांचे भाडे अजून महापालिकेला मिळालेले नाही. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबरच वेतन आयोगातील फरकही महापालिकेला द्यायचा आहे. विविध विकासकामांना निधीही कमी पडत आहे. महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन उत्पन्नाची नवनवीन साधने सध्या शोधत आहे. महापालिकेने 11 वर्षे गरीब व हुशार मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले.
आवश्य वाचा मातृछाया हरपूनही परिस्थितीवर मात
या केंद्रासाठी महापालिका प्रशासनाने मोठी वास्तूही बांधली. दीड वर्षापासून मात्र हे केंद्र बंद आहे. ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिका प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी व महापालिका प्रशासन करीत आहे. हे केंद्र खासगी संस्थेला चालविण्यास देऊन त्यातून महापालिकेला दरमहा उत्पन्न मिळवून देण्याचे द्विवेदी यांनी ठरविले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिकेने निविदाही काढली. हे केंद्र घेणारी संस्था अनुभवी असावी. तिने दर महिन्याला एक लाख 94 हजार 150 रुपयांपेक्षाही जास्त भाडे महापालिका प्रशासनाला द्यावे.
महत्त्वाची बातमी व्वा... चूक तुमची शिक्षा आम्हाला
या व्यावसायिक वापरासाठी "जीएसटी' भरावा, अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
हे केंद्र चालविण्यासाठी चार संस्थांनी निविदा भरल्या; पण भाडे जास्त वाटत असल्याने, कोणत्याही संस्थेने केंद्र चालविण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अटी शिथिल करून पुन्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा घाट घातला आहे.
निविदेला प्रतिसाद मिळेना
प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या निविदेला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे.
- दिगंबर कोंडा, प्रसिद्धी विभागप्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.