मातृछाया हरपूनही परिस्थितीवर मात 

abhijit mane
abhijit mane
Updated on

नगर : दिव्यांग मुलगा जन्माला आला तरी ती माऊली खचली नाही. आपला पोटचा गोळा इतरांपेक्षा काही कमी नाही, असा विश्‍वास तिच्या मनात ठाम होता. मुलाला जलतरणपटू बनविले. एक दिवस अचानक त्या माऊलीनेच जग सोडले. पण अशा स्थितीतही आपल्या आईची इच्छा म्हणून त्या मुलाने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला. विजयही मिळविला. त्याने जिंकलेली ही सलग चौथी जिल्हास्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धा आहे. ही कथा आहे अभिजित माने हा दिव्यांग खेळाडू आणि त्याचा आईची... 

जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धेत जलतरणात दिव्यांग खेळाडू अभिजित जगन्नाथ माने याने याही वर्षी प्रथम येण्याचा बहुमान पटकावीत, विजयाचा चौकार मारला. ही स्पर्धा विळद घाट येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात पार पडली. यामध्ये दिव्यांग खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. 

अभिजितने यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धेसह राज्यस्तरीय स्पर्धेतदेखील यश मिळविले आहे. अभिजितच्या मातु:श्रींचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. या दु:खात होरपळलेल्या अभिजितला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेलादेखील मुकावे लागले. मात्र, त्याने दु:खातून सावरून परिस्थितीवर मात करीत पुढील वर्षीदेखील स्पर्धेत प्रथम येण्याची आईची इच्छा विजयाद्वारे पूर्ण केली. 

अभिजित हा क्रीडा मार्गदर्शक (स्व.) रामदास ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली घडला. त्याला वडील जगन्नाथ माने व रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. अभिजित नगर तालुक्‍यातील बाबुर्डी घुमट येथील रहिवासी आहे. वाडिया पार्क जलतरण तलावात तो सराव करतो. टिळक रस्ता येथील मतिमंद मुलांच्या शाळेचा तो विद्यार्थी आहे. ज्योत्स्ना उद्योग केंद्र कार्यशाळेत तो सध्या शिकत आहे. 

तो आईच्या निधनाच्या दु:खातून सावरला असून, त्याची राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी चालू आहे. त्यात तो निश्‍चित यश प्राप्त करेल. 
- जगन्नाथ माने, अभिजितचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil Sangli political developments
Dhalgaon historic stepwell restoration
Almatti Dam latest water level update today
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com