esakal | बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत फक्त 113 प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत फक्त 113 प्रवेश

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून येत असून या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत फक्त ११३ विद्यार्थ्यांनी विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

बेळगाव शिक्षण जिल्ह्यात आरटीईच्या ४२० जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पालकाना करण्यात आले होते. तसेच सुरुवातीला कमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने दोन वेळा अर्ज करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली. तरीही गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही आरटीई प्रवेशासाठी कमी प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर आलेल्या अर्जांची तपासणी करून ११३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

हेही वाचा: हसन मुश्रीफांनी घेतली शरद पवारांची भेट !;पाहा व्हिडिओ

आरटीईसाठी दोन वर्षापासून नवा नियम लागू करण्यात आल्याने आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवली असून आरटीई लागू झाल्यापासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावर्षी कमी प्रमाणात आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. घरापासून दीड किलोमीटर परिघात सरकारी किंवा विनाअनुदानित शाळा नसेल तरच पालकांना खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो.मात्र सर्रास भागांमध्ये सरकारी किंवा अनुदानित शाळा असल्याने पालकांना खाजगी शाळेत अर्ज करता येत नाही. त्यामुळेही आरटीईसाठी दाखल होणाऱ्या अर्जामध्ये कमी आली असून आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिक्षण खात्याकडून दिला जातो.

"या वर्षी आरटीईअंतर्गत ११३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे तर इतर जागा शिल्लक आहेत. दरवर्षी आरटीईअंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षण खात्या कडून आव्हान केले जाते"

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

loading image
go to top