पलूस तालुक्‍यात 11 वा बळी; दिवसभरात 13 कोरोनाबाधित

संजय गणेशकर
Saturday, 15 August 2020

पलूस तालुक्‍यातील कोरोनाने 11 वा बळी घेतला आहे. तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज तालुक्‍यात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 196 वर जाऊन पोहोचली आहे. 

पलूस : पलूस तालुक्‍यातील कोरोनाने 11 वा बळी घेतला आहे. तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज तालुक्‍यात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 196 वर जाऊन पोहोचली आहे. 

पलूस तालुक्‍यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज तालुक्‍यात कुंडल येथे 5 , पलूस 3, घोगांव 2, नागठाणे,सुर्यगांव व भुवनेश्वरीवाडी मध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. पलूस आणि कुंडल येथे कोरोना पॉंझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.गुरुवारी नागठाणे येथील मयत झालेल्या 58 वर्षिय महिलेचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

नागठाणे येथील कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे.कोरोनाने आतापर्यंत तालुक्‍यातील 11 जण मयत झाले आहेत. आज अखेरपर्यंत तालुक्‍यात 196 कोरोना बांधीत रूग्णांची संख्या झाली आहे. उपचारानंतर 126 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.अजूनही 59 रुग्ण उपचारात आहेत. पलूस येथील कोंविड सेंटर मध्ये हे 59 रुग्ण उपचाराखाली आहेत. अशी माहिती तहसीलदार राजेंद्र पोळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी दिली आहे. 

दरम्यान, पलूस शहरात व काही विभागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.आतापर्यंत गांव भाग, नवोदय विद्यालय,म्हाडा कॉंलनीनवीन बौध्द वसाहत व इतर ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले.नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस व ईतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कुंडल येथेही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11th victim in Palus taluka; 13 corona during the day