बारावीचे मूल्यमापन गणेशचतुर्थीनंतर करा; प्राध्यापक संघटनेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

बारावीचे मूल्यमापन गणेशचतुर्थीनंतर करा; प्राध्यापक संघटनेची मागणी

चिक्कोडी : बारावीची पुरवणी परीक्षा गुरूवारी झाली. या परीक्षेचा निकाल लवकर देण्यासाठी शिक्षण खाते तात्काळ य़ा महिनाअखेरीस त्याचे मूल्यमापन करण्याचे नियोजन करत आहे. पण, याकाळात गणेश चतुर्थी असल्याने बारावीचे मूल्यमापन उत्सव झाल्यानंतर करावा, अशी मागणी पदवीपूर्व प्राध्यापक संघटनेने शिक्षण खात्याच्या संचालकांना निवेदनातून केली आहे.

बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात गणेश चतुर्थी मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. दक्षिणेतील प्राध्यापकांना याबाबत अडचण येणार नसली तरी या भागातील प्राध्यापकांची मागणी सण झाल्यानंतर मूल्यमापन करावे, अशी आहे. राज्यातील प्राध्यापकांनी आपली मागणी करताना 1 सप्टेंबरपासून मूल्यमापन करण्यास सुरूवात करावी, अशी मागणी केली असली तरी उत्तर कर्नाटकातील प्राध्यापकांचा याला विरोध आहे. कारण हा सण या भागात किमान पाच दिवस असतो. त्याकाळात हे मूल्यमापन करून घेतल्यास या भागातील प्राध्यापकांना अडचणीचे होणार आहे. त्यासाठी राज्य पातळीवर संघटनेने 1 सप्टेंबरपासून म्हटले असले तरी गौरी व गणपती विसर्जनानंतर मूल्यमापन करावे, अशी मागणी उत्तर कर्नाटकातील प्राध्यापकांची आहे.

राज्यातील संघटनेने एक दिवस गणेशोत्सव धरून तसे निवेदन दिले असले तरी बेळगावसह उत्तर कर्नाटकातून गणेश चतुर्थीनंतरच मूल्यमापन व्हावे, यासाठी दबाव वाढत आहे. शिक्षण खात्याने सर्व राज्यातील प्राध्यापकांचा विचार करून सण झाल्यानंतर मूल्यमापन करून घ्यावे, अशी विनंती केली आहे.

यापूर्वीचा भत्ता अद्याप नाही

बारावीची मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यासाठी गेलेल्या प्राध्यापकांना अद्य़ाप त्यांचे मानधन (भत्ता) दिलेले नाही. अनेक प्राध्यापक कंत्राट पद्धतीवर प्राध्यापकाचे काम करतात. त्यांना पगार अतिशय कमी असतो. त्यांना बाहेर जाऊन तिथे राहणे, जेवण हा खर्च करून बारावीचे मूल्यमापन करून यावे लागत आहे. त्यांना हा भत्ता लवकर देणे आवश्यक असताना तो यावर्षी अद्याप दिलेला नसल्याचेही प्राध्यापकांनी सांगितले. यापूर्वी बारावी मूल्यमापनाचे काम पूर्ण करून येताना शेवटच्या दिवशी सर्वांना भत्ता दिला जात होता. तो भत्ता रखडल्याने अनेक प्राध्यापकांची अडचण झाली आहे.

Web Title: 12th Evaluate Ganesh Chaturthi Faculty Association Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..