आटपाडीत नाट्यगृह उभारणीसाठी १४ कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली.

आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली.

येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, ऑड. धनंजय पाटील, सोमनाथ गायकवाड, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, ''राज्य सरकारने ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रम आणि कामाने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातूनच आटपाडीत गदिमांच्या नावाने नाट्यगृह उभारणीस मंजुरी मिळाली आहे. अशा पद्धतीचे नाट्यगृह राज्यात पहिलेच तालुकास्तरावर उभा राहत आहे.''

नाट्यगृहासाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांचे मोठे सहकार्य मिळाले. यामधून सुसज्ज असे नाट्यगृह, गदिमांच्या काव्यपंक्ती आणि चित्रांच्या बोलक्या भिंती, गदिमा बंधू आणि डॉ. शंकरराव खरात यांचे साहित्य दालन, चित्रफित संग्रहालय आदी उभारले जाणार आहे, असेही श्री बाबर यांनी सांगितले.

आमदार बाबर यांनी गदिमा नाट्यगृह मंजूर करून आणल्याबद्दल त्यांचा सत्कार सरपंच वृषाली पाटील व तानाजीराव पाटील केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 crores 65 lacks approved for the construction of a grand theater in Atapadi