आईच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी न्याय... काय झाले?

 13 years after mother's death Justice ... what happened?
13 years after mother's death Justice ... what happened?
Updated on: 

सांगली ः प्राथमिक शिक्षिका असलेल्या आईचा, अल्फत जमादार यांचा 2007 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांची पेन्शन मुलगा व मुलीला मिळावी म्हणून त्यांचा संघर्ष सुरू झाला. वडिलांच्या विरोधात त्यांनी आठ वर्षे न्यायालयात लढा दिला आणि त्यानंतरची पाच वर्षे शासकीय लालफितीत अडकून पडली. अखेर त्यांना आज न्याय मिळाला.

आईची पेन्शन, फरक, सेवा योगदान, फंड ही सारी मिळून सुमारे 18 लाखांची रक्कम त्यांच्या मुलांना मंजूर झाली. आता लेकीला अनुकंपातून नोकरीची प्रतीक्षा आहे. त्यासाठी फार संघर्ष करावा लागू नये, यासाठी ती प्रार्थना करतेय. 

ही गोष्ट आहे भोसे (ता. मिरज) गावातील उल्फत जमादार यांची. त्यांचे माहेरचे नाव उल्फत अजिज मुलाणी. चाबूकस्वारवाडी येथे नोकरीत असताना त्यांचा 2007 ला मृत्यू झाला. नियमानुसार पत्नीची पेन्शन पतीला मिळते, मात्र काही घरगुती गुंतागुंतीच्या स्थितीमुळे मुलांचे हाल होतील, हे लक्षात घेऊन उल्फत यांच्या वडिलांनी नातू व नातीला ती पेन्शन मिळावी, यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला. हा खटला 2015 पर्यंत चालला. उल्फत यांच्या पतीचे त्यावर्षी निधन झाले आणि मग न्यायालयाने मुलांना पेन्शनचे वारस ठरवणारा आदेश जारी केला. त्यानंतरही पाच वर्षे तो प्रस्ताव शासकीय फेऱ्यात फिरत राहिला. 

आई वारली त्यावर्षी मुलगी अफरोजा आठ वर्षांची होती तर मुलगा आसिफ दहा वर्षांचा होता. आता ते जाणते झालेत. तेरा वर्षांनंतर त्यांनी न्यायासाठी वेगाने धडपड सुरू केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी या विषयात थेट लक्ष घातले. फायली गतीने फिरल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी त्यांच्या विशेष स्टाईलमध्ये सूचना दिल्या. त्यानंतर आज आदेश हाती आला. एकूण रक्कम सुमारे 17 लाख 82 हजार रुपये या लेकरांना मिळतील. अफरोजाला तिच्या लग्नापर्यंत महिन्याकाठी सुमारे साडेचार हजारांची पेन्शन मिळेल. शिवाय, अनुकंपाची नोकरी माझ्या बहिणीला द्या, असे आसिफने सांगितले आहे. तोही विषय काही काळात मार्गी लागेल, असे श्री. डोंगरे यांनी सांगितले. 

आजोबांचे डोळे पाणावले 

या साऱ्या लढाईत दोन एकर शेतीवर गुजराण करणाऱ्या अजित मुलाणी या आजोबांच्या डोळ्यात मात्र पाणी तरळले. लेक गेली, मात्र तिच्या दोन्ही लेकरांना न्याय मिळवून देऊ शकलो, याचे समाधान त्यांच्या डोळ्यात दाटले होते. 

सामान्यांना त्रास होणार नाही

जिल्ह्यातील अनेकांची अशी काही प्रकरणे रखडलेली आहेत. त्यांनी लगेच पुढे यावे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कक्षात मी सकाळी 11 पासून सायंकाळी पाचपर्यंत उपलब्ध आहे. कोणत्याही कारणाने सामान्यांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करू. 

- शिवाजी डोंगरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com