
-शैलेश पेटकर
सांगली : जिल्ह्यात गुन्हेगारीने आता कळस गाठलाय. भुरट्या गुन्हेगारांच्या कमरेलाही गावठी कट्टे दिसून येताहेत, हे गेल्या महिन्यांतील घटनांतून समोर येते. शस्त्र तस्करीविरोधात पोलिस दलाकडून कारवाई केली जाते. मात्र, त्याची परराज्यांतील पाळेमुळे खणण्याचे सांगली पोलिस दलासमोर मोठे आव्हान आहे. गत साडेचार वर्षांत १३४ गावठी कट्टे, तर २५९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, शहरात आजही गावठी कट्ट्यांची सर्रास विक्री होत आहे, ही बाब चिंता वाढवणारी आहे.