निपाणीत १४ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’: आता निवडणूक तारखेकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

सत्तेसाठी विविध गावांत राजकीय घडामोडींचे संकेत आहेत.३० डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आरक्षणाकडे डोळे लागून होते.

निपाणी (बेळगावात) :  निवडणूक प्रशासनाने आज तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदांसाठी अधिकृत आरक्षण सोडतीची घोषणा केली. आता ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या घोषणेकडे सदस्यांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी निवडणूक निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतींवरील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचे संभाव्य चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणामुळे गावागावांत राजकीय घडमोडी वेग घेणार आहेत. काठावर संख्याबळ असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मात्र अपक्ष सदस्यांचा भाव वधारला आहे. 

सत्तेसाठी विविध गावांत राजकीय घडामोडींचे संकेत आहेत.३० डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आरक्षणाकडे डोळे लागून होते. आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमेठ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत झाली. व्हिडीओ स्क्रीनवर ज्या-त्या ग्रामपंचायतीची सोडत दर्शविण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरनुसार आरक्षणाची सोडत आली आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सोडत निघाली आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या सोडतीवर आक्षेप घेण्यासारखे नाही. आरक्षण जाहीर करताना आयोगाच्या नियम, अटींचे काटेकोर पालन झाले आहे. काही ठिकाणी रोटेशनप्रमाणे आरक्षण निघाले आहे.’या वेळी निवडणूक विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नागराज पाटील यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.काही गावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी जाहीर आरक्षणावर आक्षेप घेतला. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, निवडणूक विभागाचे अभिषेक बोंगाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतनिहाय आरक्षण असे ः
ग्रामपंचायत    अध्यक्ष    उपाध्यक्ष
भोज    ओबीसी-ए    सामान्य महिला
शिरगुप्पी    ओबीसी-ए    एससी महिला
ढोणेवाडी    ओबीसी-ए    एससी महिला
सौंदलगा    ओबीसी-ए महिला    ओबीसी-बी महिला
अक्कोळ    ओबीसी-ए महिला    सामान्य
यमगर्णी    ओबीसी-ए महिला    एससी
कारदगा    ओबीसी-बी    ओबीसी-ए महिला
मांगूर    ओबीसी-बी महिला    सामान्य
शिरदवाड    सामान्य    सामान्य
आडी    सामान्य    सामान्य महिला
जत्राट    सामान्य    सामान्य महिला
शेंडूर    सामान्य    सामान्य महिला
ममदापूर-केएल    सामान्य    सामान्य महिला
यरनाळ    सामान्य    ओबीसी-ए महिला
सिदनाळ    सामान्य    सामान्य
कोगनोळी    सामान्य महिला    ओबीसी-बी
गळतगा    सामान्य महिला    ओबीसी-ए महिला
बेडकिहाळ    सामान्य महिला    एससी महिला
कुन्नूर    सामान्य महिला    ओबीसी-ए
माणकापूर    सामान्य महिला    सामान्य
आप्पाचीवाडी    सामान्य महिला    एससी
बारवाड    सामान्य महिला    सामान्य
कुर्ली    एससी    सामान्य महिला
लखनापूर    एससी    सामान्य महिला
कोडणी    एससी महिला    सामान्य
बेनाडी    एससी महिला    ओबीसी-ए
हुन्नरगी    एससी महिला    ओबीसी-ए

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 Gram Panchayats women Leaving the president vice president belgaum news marathi news