सिव्हीलमध्ये नव्याने १४ कोरोना संशियत दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

आतापर्यंत सुमारे दोनशे जणांची तपासणी करून त्यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवले आहे. तीन पाॅझिटिव्ह रूग्णालयात बूथ हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले आहे. पहिल्या रुग्णाला चौदा दिवस झाल्यानंतर त्याचे सॅम्पल तपासणी पाठविण्यात येणार आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोन हे थेट परदेशातून आले होते. तर एक त्यांच्या संपर्कात आला होता. कोरोना झालेलेल्या तीनही रूग्णाची तब्येत ठणठणीत आहे. मात्र,त्यांच्या दुसऱ्या टेस्टमध्ये काय रिपोर्ट येतो. त्यानंतरच त्यांच्याबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.

शहरी भागातून तसेच परदेशातून येणाऱ्या रूग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कोरोना संशयित 14 जण आज नव्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची  तपासणी करून सॅम्पल पुणे येथे तपासणी पाठविले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात सर्वत्र क्रू लावण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे दोनशे जणांची तपासणी करून त्यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवले आहे. तीन पाॅझिटिव्ह रूग्णालयात बूथ हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले आहे. पहिल्या रुग्णाला चौदा दिवस झाल्यानंतर त्याचे सॅम्पल तपासणी पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, आज सकाळी पुन्हा नव्याने 14 संशयित रूग्णालयात दाखल झाले आहेत. दहा जणांना जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर, तीन जणांना खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. लोणी येथे एकाला भरती करण्यात आले आहे. काल कर्जतमधून पळालेले माय-लेक, तसेच आज मिरजगाव परिसरातून तीनजणांना दाखल करण्यात आलं. साईंच्या शिर्डीतून काल तीनजणांना उपचारासाठी आणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 new Corona suspect filed in civil