esakal | सेल्फी बेतला असता जीवावर; 140 फूट दरीत पडूनही 'तो' बचावला
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फी बेतला असता जीवावर; 140 फूट दरीत पडूनही 'तो' बचावला

सेल्फी बेतला असता जीवावर; 140 फूट दरीत पडूनही 'तो' बचावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोकाक : येथील धबधबा काठावर मित्रांसमवेत सेल्फी घेताना १४० फूट दरीत पडूनही केवळ दैव बलवत्तर म्हणून युवक बचावल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. प्रदीप सागर (वय २७, रा. जेवरगी, जि. गुलबर्गा) असे या युवकाचे नाव आहे.

याबाबत गोकाक पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी होती. त्यामुळे एचडीएफसी बॅंकेच्या बेळगाव येथील शाखेतील पाच कर्मचारी गोकाक धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या उजवीकडील बाजूला असणाऱ्या दगडावर उभे राहून ते सेल्फी घेत होते. त्याचवेळी प्रदीपचे बूट दगडावरुन घसरल्यामुळे तो १४० फूट खोल दरीत कोसळून बेशुद्ध झाला. सोबतच्या मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मोबाईलद्वारे कॉल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मोबाईलची रिंग होऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा: आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मात्र, सायंकाळच्या अंधुक प्रकाशामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. दरम्यान, रविवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रदीप शुद्धीवर आला. त्याने सोबतच्या मित्रांना मोबाईलद्वारे कॉल करुन दगडाच्या फटीतून बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांना कळवून आपद्काळात मदत करणारा सहासी आयुब खान यांच्या मदतीने प्रदीपला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला गोकाकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक के. वालीकर अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top