आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल

आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल
Summary

आर्थिक देवाण घेवाणासाठी आपण वेगवेगळ्या डिजिटल साधनांचा वापर करतोय.

दसरा, दिवाळी म्हटंल की सुगीच्या दिवसांना सुरुवात होते. या दिवसांत भात कापणीला, झोडपणीला प्रारंभ केला जातो. दरम्यान सुगी म्हटंल की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाची पालवी फुटणारे दिवस. घरी धान्याच्या कणगी भरणार म्हणून कुटुंबाचे सदस्यही खुश असतात. मात्र यासोबत आपल्याकडे अजून एक मिळती जुळती परंपरा या दरम्यान पहायला मिळते. ती म्हणजे लोककलावंतांची आणि त्याच्या कलेची.

आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल
महामंडळाची नवी शक्कल; लालपरी धावणार चालक-वाहकांनी सुचवलेल्या मार्गावर

आपल्याकडे लोककलेला वेगळ महत्व आहे. यामुळे लोककलावंतांचा विशेष आदर आणि कौतुक केलं जात. या सुगीच्या दरम्यान अनेक लोककलावंत दारी येतात. ही परंपरा खूप वर्षांपासून आपल्याकडे रुजली आहे. वासुदेव, कडकलक्ष्मी, पिंगळा, नंदीबैल, बहुरुपिया असे अनेकजण आपल्या दारी येत असतात. काही भविष्यवाणी करतात, तर काही देवांचा महिमा सांगतात. काही पुढच्या वर्षीचा पावसाचा निरोप देतात तर काही लहानांना हसवण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी येतात. यांच्या दारी येण्याचा कालावधी हंगामा प्रमाणे बदलत राहतो.

आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास

दरम्यान सध्या डिजिटल इंडियाच्या नाऱ्यामुळे प्रत्येकजण डिजिटल झाला आहे. आर्थिक देवाण घेवाणासाठी आपण वेगवेगळ्या डिजिटल साधनांचा वापर करतोय. सोबत पैसे न बाळगता फोन पे, गुगुल पे अशा काही साधनांचा वापर केला जातो. म्हणूनच की काय आता हे लोककलावंतही डिजिटल झाले आहेत. एकेकाळी धनधान्याची मागणी करणारे हे कलावंत आता या स्कॅनकोडचा एक फलकच सोबत घेऊन फिरत आहेत. या स्कॅनकोडचा सर्रास वापर सुरु झाला आहे. अशाच एका कलावंताचा फोटो सध्या सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. यात तो नंदीबैलासोबत दिसत आहे. बैलाच्या दोन्ही शिंगांमध्ये तो स्कॅनर दिसत आहे. 'नंदीबैल - डिजिटल कलयुगाचा महिमा' या नावाने या फोटोने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे. आता या कलयुगात लोककलावंतही डिजिटल भाषा शिकत आहेत हे औत्सुकत्याचे ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com