दूध का दूध नाहीच, पाणीच पाणी! 

युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - "दूध का दूध और पानी का पानी', अशी हिंदी म्हण प्रचलित आहे. खरे काय आणि खोटे काय ते दाखवतोच, असा त्यामागील अर्थ आहे. अन्न औषध प्रशासनाने गेल्या महिन्यापासून घेतलेल्या दुधाच्या नमुन्यांचा विचार करता यातही भेसळ होत असल्याचे स्पष्ट होते. दुधाची घनता (फॅट) वाढविण्यासाठी स्टार्च या पावडरचा वापर झाल्याचे प्राथमिक चाचणीत निष्पन्न झाले आहे. भेसळीचे वाढते प्रमाण पाहता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सध्या "अन्न औषध'च्या रडारवर आहेत. कोल्हापूर शहर, करवीर आणि कागल तालुक्‍यांत 15 ठिकाणी दुधाचे नमुने घेतले आहेत. 

पाण्यासारखा पैसा मिळविण्याचे उत्तम साधन म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मूळ उत्पादकाला मिळतात किती. पुढे विकणाऱ्याचा मध्ये फायदा आणि खरेदीदाराला तर पन्नास रुपयांच्या दराने दूध खरेदी करावे लागते. शेणोली (ता. चंदगड) येथे 5 जानेवारीला झालेल्या कारवाईत अकराशे लिटर दूध जागेवर ओतून टाकले. यात स्टार्च पावडरचा वापर केल्याचे चाचणीत आढळून आले. 30 किलो पनीर, 10 किलो देशी तूप जप्त करण्यात आले. 

हरे कृष्ण मिल्क प्रॉडक्‍टवरील कारवाई हे एक उदाहरण असले तरी दुधात कोण किती पाणी घालतो आणि आणखी काय मिसळतो याचा अंदाज ग्राहकांना नाही. दुधाची पिशवी घेतली आणि वाटेला लागला, अशी गिऱ्हाईकाची स्थिती. 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर राज्याचा अन्न, औषध प्रशासन विभाग झाला आहे. दूध संकलन, प्रक्रियेच्या ठिकाणी नमुने घेतले जात आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध व्यवसायात अग्रेसर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय तेजीत आला. 

दुधासोबत तूप, खवा, पनीर, अन्य दुग्धजन्य पदार्थांनाही भारी मार्केट. सणासुदीचे दिवस आले की, या पदार्थांना मोठी मागणी. गिऱ्हाईक आहे म्हटल्यावर भेसळीचा उद्योगही जोरात. अशा प्रवृत्तीला चाप बसावा यासाठी दूध डेअरी, तेथील प्रक्रिया केंद्र, चाचणी घेण्याची पद्धत यावर "अन्न, औषध'चे बारकाईने लक्ष आहे. कुणाचे कितीही राजकीय वजन असले तरी बळी न पडता दुधाचे नमुने घेतले जात आहेत. तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातील. तेथून दोष आढळल्यास परवाना रद्दची कारवाई होणार आहे. 

नमुने घेतले जाणार 
लहान मुलापासून ते घरगुती कारणासाठी दूध ही अपरिहार्य बाब आहे. दुधाशिवाय अनेकांची सकाळच उजाडत नाही. पूर्वी गल्लोगल्ली गवळी दूघ घालत होते. आता त्यांची संख्या कमी झाली आणि पॅकिंगमध्ये दूध येऊ लागले. या दुधात पाणी किती, खरे दूध किती याची पाहणी करायला काही गिऱ्हाईक जात नाही. त्यामुळे ही जबाबदारी अन्न औषधच्या अधिकाऱ्यांवर टाकली आहे. दुधासोबत तूप, खवा, पनीर यांसह अन्य दुग्धजन्य पदार्थांचे नमुने नजीकच्या काळात घेतले जाणार आहेत.

Web Title: 15 milk samples in kagal