म्हैसाळ गावात 15 रूग्ण; 40 जणांचे नमुने तपासणीसाठी 

प्रमोद जेरे 
Tuesday, 18 August 2020

मिरज : तालुक्‍यातील म्हैसाळ गावाची कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

मिरज : तालुक्‍यातील म्हैसाळ गावाची कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथे रविवारी (ता. 16) नव्याने कोरोना बाधित तीन रूग्ण सापडले. त्यामुळे गावातील कोरोना बाधिताची संख्या 15 झाली आहे. याला प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार खंदारे यांनीही दुजोरा दिला आहे. 

म्हैसाळ गाव गेल्या पाच महिन्यापासून कोरोनापासून दुर होते. गेल्या पाच महिन्यात म्हैसाळमध्ये एकही रूग्ण सापडलेला नाही. पण गेल्या दहा पंधरा दिवसात म्हैसाळमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. यासाठीच्या चाचण्या जशा जास्त संख्येने होत आहेत, तस तशी कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

याबाबत डॉ. खंदारे म्हणाले,""आतापर्यंत कोरोनाची लक्षणे आढललेल्या 40 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय काही जणांची रॅपिड चाचणी केली आहे. पण तपासण्यांमध्ये वाढणारी रूग्ण संख्या चिंताजनक आहे.'' 

म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत 15 रूग्ण सापडले आहेत. या 15 जणांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून पुढे येऊन चाचणी करून घ्यावी. कोणाही ग्रामस्थांनी घाबरून चाचणी करून घेण्यास टाळाटाळ करु नये आणि आवश्‍यक ती काळजी घ्यावी. 
- नंदू खंदारे, वैद्यकीय अधिकारी, म्हैसाळ 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 patients in Mahisal village; 40 samples for testing