कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे.
मुंबई/ सांगली : कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेंतर्गत (Krishna-Koyna Irrigation Schemes) म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी (Mhaisal Lift Irrigation Scheme) सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपये, तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख अशा दोन हजार ८६९ कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.