सांगलीत दिवसात रुग्ण 17 ; कोरोनामुक्त 7 

शैलेश पेटकर 
Monday, 1 March 2021

आज दिवसात 17 जणांना कोरोनाचा बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात सहा जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवसभरात सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 167 रुग्ण उपचार आहेत. 

सांगली : आज दिवसात 17 जणांना कोरोनाचा बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात सहा जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवसभरात सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 167 रुग्ण उपचार आहेत. 

आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 779 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 12 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 1206 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये सहा जण कोरोना बाधित आढळले. आज आढळलेल्या 17 कोरोना बाधित रुग्णांत कडेगाव तालुक्‍यात सहा रुग्ण आढळून आले आहेत. खानापूर, तासगाव येथे प्रत्येकी दोन बाधित आढळून आले. जत आणि मिरज तालुक्‍यात प्रत्येक एक रुग्ण आढळून आला. महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील पाच बाधा झाली. 7 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 167 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 32 जण चिंताजनक आहेत. 105 रुग्ण गृहअलकीकरणात आहेत. 60 जण रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 
आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48492 
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46567 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 167 
आजअखेर जिल्ह्यातील मृत्यू- 1758 
ग्रामीण भागातील रुग्ण- 24522 
शहरी भागातील रुग्ण- 7244 
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16726 

कोरोना तालुकानिहाय स्थिती 
आटपाडी- 2507 
जत- 2339 
कडेगाव- 2965 
कवठे महांकाळ- 2492 
खानापूर- 3012 
मिरज- 4554 
पलूस- 2632 
शिराळा- 2300 
तासगाव- 3449 
वाळवा- 5516 
महापालिका- 16726 
एकूण - 48492

 

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 patients in Sangli day; Corona free 7