
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने दहावीची परीक्षा तीन महिने उशीराने घेण्यात आली होती
बेळगाव : शिक्षण खात्याने दहावीच्या निकालानुसार शाळांना श्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 472 शाळांपैकी 172 शाळांचा अ श्रेणीमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे इतर शाळांना आपल्या निकालात वाढ करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत.
शिक्षण खात्याने यावर्षी पासून श्रेणीनुसार शाळांना अ. ब. क. व ड श्रेणीत विभागण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षण खात्याने शाळांच्या निकालाचा अहवाल पाहण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात सरकारी, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा व कित्तुर चन्नम्मा निवाशी शाळा, मुरारजी देसाई निवाशी शाळेसह एकूण 472 शाळा आहेत. यापैकी जिल्ह्यातील एका शाळेचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्यामुळे त्या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 81 शाळांचा निकाल 40 टक्कांपेक्षाही कमी लागला आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने दहावीची परीक्षा तीन महिने उशीराने घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळी निकालात मोठी घट झाल्याचे मत शिक्षकांमधुन व्यक्त जात आहे. मात्र दरवर्षीच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल कमी लागत असून दरवेळी निकालात घसरण होत आहे. याकडे शिक्षण खात्याने वेळीच लक्ष देणे आवश्यक असून यावेळी कोरोनाच्या संकटामुळे अजून शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावीची परीक्षा विलंबाने होणार आहे. त्यामुळे यावेळीही निकालावर मोठा परीणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा - जुनी घरे पाडून लोकांवर बेघर होण्याची वेळ आली ; ६०० कुटुंब निधीविना अधांतरीच
2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालाचा तपशिल
शाळा
*100*90 ते 99.99*80 ते 89.99*70. 79.99*60 ते 69.99*40 ते 59.99*40 टक्कांपेक्षा कमी
सरकारी शाळा*1*12*17*20*20*41*20*0
अनुदानित शाळा*3*13*22*18*31*61*38*0
विनाअनुदानित शाळा*2*18*19*17*23*40*23*1
कित्तुर चन्नम्मा निवाशी शाळा*3*1*2*0*0*0*0*0
मुरारजी देसाई निवाशी शाळा7*4*3*0*0*0*0*0
एकुण*470*11*48*58*55*74*142*81*1
दहावीच्या निकाल वाढीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही अनेक शाळांचा निकाल अतिशय कमी लागत असून 2019 - 20 च्या शैक्षणिक वर्षात 81 टक्के शाळांचा निकाल कमी लागला आहे. ज्या शाळांचा निकाल कमी लागला आहे. त्या शाळांना निकाल वाढीसाठी आवश्यक सूचना करण्यात आली आहे.
-ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी
संपादन - धनाजी सुर्वे