हंगामात साडेसतरा कोटी युनिट वीजनिर्मिती

हंगामात साडेसतरा कोटी युनिट वीजनिर्मिती

सांगली - साखर निर्मितीपेक्षा उपपदार्थ निर्मितीपासून कारखान्यांना मोठे घबाड मिळाले आहे. एकीकडे साखरेचाही दर तेजीत असताना आता वीज निर्मिती करून कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. त्यामुळे यंदा साखर सम्राटांची पाचही बोटे तुपात आहेत. यंदाच्या हंगामात साखर उत्पादनाबरोबर वीज निर्मितीमध्येही जिल्ह्याने आघाडी मारली आहे. हंगामात सुमारे साडेसतरा कोटी युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यातून कारखान्यांच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. 

जिल्ह्यातील सात कारखान्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प आहे. या हंगामातील ३१ जानेवारी २०१७ पर्यंत सात कारखान्यांच्या माध्यमातून १७ कोटी ६१ लाख  ५ हजार युनिटची वीज निर्मिती झाली आहे. जिल्ह्यातील आणखी काही कारखान्यांचे प्रकल्प पुढच्या गळीत हंगामात सुरू होणार आहेत. वीज उत्पादनात सोनहिरा कारखान्याने बाजी मारली असून, त्याखालोखाल क्रांती कारखान्याचा क्रमांक येतो. जिल्ह्यात सर्वांत प्रथम सहवीज निर्मिती प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजारामबापू कारखान्याने रोवली आहे. त्यानंतर एक एक करत चार कारखान्यांनी सहवीज प्रकल्प उभा करून कारखाने  सक्षम केले आहेत. यंदाच्या हंगामात वांगीच्या सोनहिरा कारखान्याने जानेवारी अखेर ५ कोटी २ लाख  ६५ हजार ५४० युनिट विजेचे उत्पादन केले आहे. तर ३ कोटी ३८ लाख ९३ हजार ४६० युनिट वीज विकली आहे. या कारखान्याचा जिल्ह्यातील सर्वांत मोठा २२ मेगा वॉटचा प्रकल्प आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने गरूडभरारी घेत ३ कोटी ३८ लाख २२ हजार ७०० युनिटची निर्मिती केली. यामध्ये १ कोटी ९८ लाख ७० हजार युनिटची विक्री करण्यात आली आहे. वाटेगावच्या राजारामबापू कारखान्याच्या युनिट २ ने २ कोटी ३५ लाख ५५ हजार ६०० युनिटचे उत्पादन केले आहे. यामध्ये कारखान्याने १ कोटी ३४ लाख ९६ हजार ४०० युनिट वीज विकण्यात आली आहे. शिराळ्या तालुक्‍यातील विश्‍वासराव नाईक कारखान्याने २ कोटी ७८ लाख ५० हजार २०४ युनिटचे उत्पादन करण्यात आले आहे. कारखान्याने १ कोटी ८३ लाख ६८ हजार ४६ युनिट वीज बाहेर विकण्यात आली आहे. म्हैसाळ येथील मोहनरावजी शिंदे कारखान्याने १ कोटी ८०  लाख ३८ हजार युनिटचे उत्पादन केले आहे. यामध्ये कारखान्याने १ कोटी १० लाख ६६६ हजार ४०० युनिटची विक्री करण्यात आली आहे.

खासगी कारखान्यांमध्येही प्रकल्प
जिल्ह्यात २ खासगी कारखान्यांनीसुद्धा सहवीज प्रकल्प उभारून विजेची निर्मिती केली आहे. यामध्ये आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्‍यातील राजेवाडी येथील श्री श्री कारखान्याने १ कोटी ६५ लाख ७४ हजार युनिटचे उत्पादन केले आहे, तर १ कोटी ६ लाख ४ हजार २५० युनिट बाहेर विकले आहे. खानापूर तालुक्‍यातील उदगीर शुगर या कारखान्याने ६० लाख ४० हजार २५० युनिटची निर्मिती केली आहे. तर ३८ लाख ७३  हजारांची विक्री केली आहे.

११ कोटींवर वीज युनिटची विक्री
सांगली जिल्ह्यातील ५ सहकारी व २ खासगी साखर कारखान्यांमध्ये सहवीज प्रकल्पाची उभारी आहे. या ७ कारखान्यांनी ११ कोटी ११ लाख ७५ हजार २४३ युनिटची विक्री महावितरण कंपनीला केली आहे. यामध्ये कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे.

हंगामातील टॉप थ्री कारखाने
वांगी      सोनहिरा कारखाना      ५ कोटी २ लाख ६५ हजार ५४० युनिट 
कुंडल      क्रांती कारखाना      ३ कोटी ३८ लाख २२ हजार ७०० युनिट
चिखली      विश्‍वासराव नाईक      २ कोटी ७८ लाख ५० हजार २४१ युनिट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com