म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला 1.75 टीएमसी पाणी पुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

यासाठी योजनेच्या विविध टप्यातील साधारणत: 70 ते 75 पंप चालवण्यात आले असून आतापर्यंत 1.75 टी. एम. सी. पाणी नदीतून उचलण्यात आल्याची माहिती ताकारी, म्हैशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागातून देण्यात आली. 

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी 6 तालुक्‍यातील सर्व तलाव व बंधारे भरुन घेतले. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा 6 तालुक्‍यातील योजनेच्या लाभाक्षेत्रातील पाणी साठे भरुन देण्यात आलेले आहेत व त्याचा अंदाजे 30 हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी फायदा होणार आहे.

यासाठी योजनेच्या विविध टप्यातील साधारणत: 70 ते 75 पंप चालवण्यात आले असून आतापर्यंत 1.75 टी. एम. सी. पाणी नदीतून उचलण्यात आल्याची माहिती ताकारी, म्हैशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागातून देण्यात आली. 

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाणी उचलण्याचे आदेश दिले होते. 17 ऑगस्ट 2020 पासून गेला महिनाभर पावणेदोन टी. एम. सी. पाणी योजना चालवून उचलण्यात आले व कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागासाठी देण्यात आले.

यासाठी योजनेच्या विविध टप्यातील साधारणत: 70 ते 75 पंप चालवण्यात आले आहेत. उचललेल्या पाण्यातून मिरज तालूक्‍यातील 2 लघु पाटबंधारे तलावासह इतर 66 पाणीसाठे, कवठेमहांकाळ तालूक्‍यातील 5 लघु पाटबंधारे तलावासह इतर 41 पाणीसाठे, तासगांव तालुक्‍यातील 3 लघु पाटबंधाऱ्यांसह तलावासह इतर 5 पाणीसाठे, यासाठी 850 द. ल. घ. फू.पाण्याचा वापर करण्यात आला. एकूण 68 गावांना त्याचा फायदा झाला. 
जत तालुक्‍याजील 5 लघु पाटबंधारे तलावासह इतर 37 पाणीसाठे, सांगोला तालुक्‍यातील 17 पाणीसाठे व मंगळवेढा तालुक्‍यातील 2 पाणीसाठे भरुन देण्यात आले.

यासाठी 900 द. ल. घ. फू. पाण्याचा वापर करण्यात येऊन 37 गावांना त्याचा फायदा झाला. योजनेतून 1.75 टी.एम.सी .पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा 6 तालुक्‍यातील योजनेच्या लाभाक्षेत्रातील पाणी साठे भरुन देण्यात आलेले आहेत व त्याचा अंदाजे 30 हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी फायदा होणार आहे. कृष्णा नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिल्यामुळे या भागास पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.75 TMC water supply to drought prone areas from Mahisal scheme