
जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात दोघांना जणांना बाधा झाली. 19 जण कोरोनामुक्त झाले. उपचारादरम्यान मिरज तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 834 झाली.
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात दोघांना जणांना बाधा झाली. 19 जण कोरोनामुक्त झाले. उपचारादरम्यान मिरज तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 834 झाली.
आज 239 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात 3 बाधित आढळले. 890 जणांची अँटीजेन तपासणी केली. त्यात 18 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्यात चार, जत तालुक्यात दोन, कडेगावमध्ये 1, खानापूर चार, पलूस तालुक्यात एक, तर तासगाव तालुक्यात पाच जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात सांगली-मिरज शहरात एक बाधित आढळला.
सध्याची स्थिती अशी ः
आजचे बाधित ः 19, उपचाराखाली ः 214, बरे झालेले ः 45 हजार 882, मृत्यू ः 1738, बाधित ः 47 हजार 834, चिंताजनक 50, ग्रामीण बाधित ः 24 हजार 213, शहरी बाधित ः 7 हजार 117, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 504.
संपादन : प्रफुल्ल सुतार