१९३० सालचे हे ब्रिटिशकालीन मिनी फोर्ड मॉडेल फक्त ३० हजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ford
१९३० सालचे हे ब्रिटिशकालीन मिनी फोर्ड मॉडेल फक्त ३० हजारात

१९३० सालचे ब्रिटिशकालीन मिनी फोर्ड मॉडेल फक्त ३० हजारात

सांगली : आधी देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार (Datta Lohar) यांच्या सुपिक डोक्यातून साकारलेली मिनी जिप्सी (Mini Gypsy)चांगलीच चर्चेत आली. खुद्द आनंद महिंद्रा (Anand Mahindra)या देशी जुगाडावर फिदा झाले. त्यानंतर सांगलीतील दुसऱ्या हुनरने ब्रिटिशकालीन फोर्ड (British era Ford) साकारत कल्पकता सिध्द केली आहे. अवघ्या तीस हजारात भंगार साहित्यातून अशोक आवटी (Ashok Avati)यांनी साकारलेली चारचाकी फोर्डची सवारी सांगलीकरांच्या आकर्षणाचा विषय बनलीय. १९३० सालचे हे ब्रिटिशकालीन फोर्ड मॉडेल मिनी स्वरूपात आणले आहे.(1930s British model Mini Ford only thirty thousand)

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

येथील काकानगर परिसरातील अशोक संगाप्पा आवटी दुचाकी गॅरेजचालक मुळचे कर्नाटकातील सातवीपर्यंत शिकलेले दहा वर्षांपूर्वी त्यांच्या घरात वीज नसल्याने त्यांनी जुगाड करुन पवनचक्कीही उभारली होती. अत्यंत कमी खर्चात तीन पात्याची पवनचक्की साकारत काळोख दूर केला होता. परिस्थितीने त्यांना अनेकवेळा मात दिली. दोनवेळच्या महापुराने त्यांचे होत्याचे नव्हते झाले. मात्र ते खचले नाहीत. दारात चारचाकी असावी, हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न त्यांनाही खुणावत होतेच. यु-ट्यूबवर त्यांनी ब्रिटिशकालीन फोर्ड गाडीचे मॉडेल पाहिले होते. तेव्हा ते प्रत्यक्षात कसे साकारता येईल, याचाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

मात्र त्यासाठी नवे साहित्य आणणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. गॅरेजमध्ये भंगारात जाणाऱ्या वस्तूंपासून त्यांनी जुगाड करत एमएटी गाडीचे इंजिन फोर्ड गाडीच्या निर्मितीसाठी वापरले. रिक्षाचे हब, ॲक्सेल, लोखंडी पत्रा, हिरोहोंडा गाडीच्या रिमने फोर्ड साकारत गेली. भंगारातील लोखंडाने गाडीची बॉडी बनली. सुटे भाग वेल्डिंगने जोडले गेले. पत्र्याला रंगांचा साज चढला. तत्कालीन फोर्ड गाडीसारखा हॉर्न, हेडलाईट, सीट, स्टेरिंग अगदी हुबेहूब साकारत गेले. रिक्षासारखी हॅंड किक बसवण्यात आली. अखेर फोर्ड सुरु झाली. रस्त्यावर धावू लागली. दोन वर्षांचे प्रयत्न फळाला आल्याचा आनंद आवटी कुटुंबियांना झाला. अवघ्या १०० किलो वजनाची ही लाईटवेट फोर्ड गल्लीबोळातून धावताना आपसूकच नजरा तिकडे वळतात. गाडीला क्रमांकही फोर्ड १९३० दिला गेला. सांगलीचा हा अल्पशिक्षित मिस्त्री स्वतः बनवलेल्या मिनी फोर्डमधून फिरत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने वाहनधारक हैराण झाल्याचे रोज पाहतो. त्यातून चारचाकी घेणे म्हणजे धाडसाचे होते. त्यामुळे मिनी फोर्ड गाडी बनवावी हा विचार मनात आला. त्यादृष्टीन प्रयत्नही सुरु झाले. अखेर दोन वर्षांच्या कष्टानंतर फोर्डमधून फिरल्याचा आनंद निराळाच आहे.

- अशोक आवटी, सांगली, मिनी फोर्डचे निर्माते

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top