मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shriram Police Station
मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

फलटण शहर : मुलीच्या छेडछाडीच्या (molesting a girl)कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. अन्य एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, माजी नगरसेवक फरारी आहेत. नीलेश हिरालाल चव्हाण ऊर्फ छोटा मचली (वय ३२) असे मृताचे नाव असून, त्याच्यावर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. शंकर मार्केट (Shankar Market)परिसरातील श्रीराम पोलिस चौकीसमोरच ही घटना घडल्याने सर्वसामान्यांत दहशत व भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात सैफुल्ला सलीम शेख (वय २८), जमीर सलीम शेख (वय २८, सर्व रा. कसबा पेठ, फलटण), बिलाल सलीम मुल्ला (वय २५, रा. वनदेवशेरी, कोळकी) व उमर तथा राज इसाक बागवान (वय २९, रा. महतपुरा पेठ, मलठण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

या सर्वांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. १२) दुपारी पावणेचारच्या सुमारास नीलेश चव्हाण तथा छोटा मछली व भरत फडतरे हे शंकर मार्केट परिसरातील श्रीराम पोलिस चौकीसमोर (Shriram Police Station)थांबले होते. या वेळी तेथे माजी नगरसेवक सलीम बाबुमियाँ शेख (वस्ताद), सैफुल्ला शेख, जमीर शेख, बिलाल मुल्ला, उमर बागवान व अन्य एका अनोळखीने चव्हाण व फडतरे यांना तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण केली. जखमी नीलेश यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. फडतरे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना पोलिस चौकीसमोर व भाजीमंडईच्या तोंडावर घडल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित सलीम वस्ताद हे फरारी आहेत. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात मध्यरात्रीनंतर झाली. याबाबतची फिर्याद कांता हिरालाल चव्हाण (वय ५५, रा. पवार गल्ली, कसबा पेठ, फलटण) यांनी दिली असून, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे तपास करीत आहेत. दरम्यान, आज अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांच्यासह घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा: '2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट'

मार्केट परिसरातील सीसीटीव्ही बंद

मारहाणीची घटना घडली तेथून काही फुटांवरील खांबावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला आहे; परंतु गेली अनेक महिने शहरातील अन्य कॅमेऱ्यांप्रमाणेच येथील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहेत. त्यामुळे हा कॅमेरा चालू असता तर मारहाणीची घटना त्यामध्ये कैद झाली असती अशी चर्चा या परिसरात होती.(Satara Crime News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top