प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला मुंबईतील तो प्रवासी, अत्याचार झालेली पीडिता आणि दोन पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
-ॲड. उत्तमराव निकम
1997 Court First Judgment : ‘ते’ दहा लोक होते. सात महिला, तीन पुरुष. ट्रकमध्ये बसून आले. सारे गुन्हेगारी वृत्तीचे. त्यांची टोळी होती. कवठेमहांकाळ तालुक्यात (Kavathe Mahankal Taluka) त्यांनी दरोडे टाकत धिंगाणा घातला. दोघांना जिवानिशी मारले. शेळ्या, बोकडांवर चाकूने वार केले. कोंबड्या मारल्या. पोलिस ‘ॲक्शन मोड’वर आले. रात्रीत चक्रे फिरली. रात्री रक्ताचा सडा पाडणारी टोळी दुसऱ्या दिवशीचा सूर्य उजाडण्यापूर्वी गजाआड झाली. खटलाही तेवढ्याच ताकदीने लढला गेला.