esakal | बेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय

बेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दोन दिवसांत शाळा सुरु कराव्यात की, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करावे याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यागम तर दहावीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस शाळा घेऊन शिकवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळत विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले. तर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना काही तासांसाठी शाळेत येण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी शाळेत दाखल झाले. फेब्रुवारी महिन्यात शाळा पूर्वपदावर येत आहेत, असे वाटत असतानाच पुन्हा मार्च महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने सहावी ते नववीचे वर्ग बंद केले. दहावी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवले आहेत, मात्र एप्रिल महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालक विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दोन दिवसांत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यासाठी बंगळूरला बैठकीचे आयोजन केले आहे. सलग दुसऱ्या वर्षीही परीक्षा न घेता पास करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची नजर बंगळूर येथील बैठकीकडे लागून राहिल्या आहेत.

"पहिले ते नववीच्या परीक्षा न घेता पास करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र दोन दिवसात बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी