२३ वर्षांचा प्रवास; ‘अक्षरसखी’ पुस्तक भिशीनं लावलं वाचनवेड

तासगावात २५ मैत्रिणींनी जपलं, रुजवलं समाजभान
23 year journey of aksharsakhi pustak bhishi 25 friends savitribai phule education
23 year journey of aksharsakhi pustak bhishi 25 friends savitribai phule educationEsakal

Sangli News : विविध स्तर व परिस्थितीतील २५ मैत्रिणी. गृहिणी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक; पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या. तासगावात महिन्यातून एकदा जमतात. भिशी चालवतात. पैशांची नाही, पुस्तकांची.

तब्बल २३ वर्षे. क्षेत्रं, कामाची ठिकाणं वेगळी. वैचारिक नाळ छान जुळलीय. ‘अक्षरसखी पुस्तक भिशी’ नाव धारण करत सावित्रीच्या लेकींचा हा गट समाजभान रुजवतोय. सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या रोपट्याची मुळं खोल गेली, घट्ट झाली, पारंब्या तयार झाल्यात, हे अधोरेखित होतंय.

ज्येष्ठ शिक्षक सौ. सुहासिनी कराडे व अर्चना मोहोळकर यांची मैत्री होती. ती व्यापक करताना समविचारींना वाचनासाठी एकत्र केले. कराडे व मोहोळकर यांच्या पुढाकाराने मैत्रिणी वाचनवेडातून पुस्तक भिशीत सहभागी झाल्या.

महिन्यातून एकीच्या घरी जाणं, १००-२०० रुपये जमवणं, जमलेल्या पैशांतून चर्चेतून पुस्तके आणणे, नंतर वाचायला देणे, असं भिशीचं काम चालतं. एक-दोन करत भिशीचे पुस्तक भांडवल ५०० पर्यंत गेलं आहे. सर्व सभासदांची लहान-मोठ्या स्वरुपात स्वतंत्र ग्रंथालय आहेतच.

भिशीत चर्चेला विषयाचे बंधन नाही. सामाजिक, राजकीय स्त्री-पुरुष, निसर्ग, समस्या, तत्त्वज्ञान, अध्यात्म, इतिहास, समाज, शेती यावर चर्चा होते. दरवेळेला वेगळा विषय. कोरोना सोडला तर भेटणं, बोलणं, चर्चा, काही सकारात्मक कृती यात सातत्य आहे.

सारी कुटुंबं LETS BE POSITIVE म्हणत आदर्श निर्माण करत आहेत. सखींचीच नाही, तर दुसऱ्या पिढ्यातील मुलांचीदेखील वैचारिक जडणघडण होत आहेत. अमृता प्रीतम, डॉ. तारा भवाळकर ते मेघना पेठे आणि ओशोदेखील त्यांच्या वाचनात आले.

या वेडातून काही व उत्तम समुपदेशक, लेखिका, कथाकथनकार म्हणून घडल्या. सदृढ समाजासाठी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, निर्मूलन व कठीण प्रसंग, संकट, दुःखातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचे कामही केले जात आहे.

विविध प्रसंगी कमी-अधिक प्रमाणात निधी संकलन करून डॉ. सुनीलकुमार लवटे, नसीमा हुरजुक, उज्वला परांजपे काम करीत असलेल्या संस्थांना मदतही केली. डॉ. मनीषा माळी व डॉ. अनिल माळी, डॉ. कविता जाधव व डॉ. विजय जाधव समुपदेशक म्हणून चांगली मदत करतात.

वंजारवाडीत विधवांचा सन्मान

वंजारवाडी या छोट्या गावात प्रबोधन व चर्चा करून विधवांना एकत्र आणले. मुख्य प्रवाहात सन्मान मिळण्यासाठी प्रवृत्त केले, आत्मभान दिले गेले. ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्या आता जुन्या प्रथा-परंपरांना दूर करून प्रगती साधत आहेत.

कृतीतून आदर्श...

पेडच्या शेखर रणखांबे यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘रेखा’ लघु चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावर मोहोर उमटवली. त्यांना मदत व गौरव करतानाच अक्षरओळखही नसलेली नायिका माया पवारला साक्षर करण्याचा विडा नूतन परीट यांनी उचलला. ही एक सावित्रीची लेक दुसरीला सावरतेय आहे, हे सांगणारी गोष्ट आहे.

पुस्तकभिशीमुळे कुटुंबीयांचा दृष्टिकोन विशाल झाला. सामाजिक भान सुस्पष्ट झाले. सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असल्याचा अनुभव मिळतोय.

-छाया खरमाटे, शिक्षक व माजी सभापती, जिल्हा परिषद, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com