
Indian Army : भारतीय सेनेतील लेफ्टनंट पदावर नुकतीच निवड झालेला पलूस येथील जवान अथर्व ऊर्फ विकी संभाजी कुंभार (वय २६) याचे रविवारी (ता. ६) पहाटे गया (बिहार) येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे धावण्याचा सराव करत असतानाच उष्माघाताच्या धक्क्याने निधन झाले. साोमवारी (ता. ७) सकाळी पलूस येथे अथर्वच्या निधनाची बातमी समजताच त्याचे कुटुंबीय व शहरावर शोककळा पसरली. उद्या मंगळवारी (ता. ८) सकाळी पलूस येथे त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.