भयानकच...लॉकडाउन काळात विनाअनुदानितच्या 27 शिक्षकांचा मृत्यू...आत्महत्या व काळजीने हृदयविकाराचा धक्का...सविस्तर वाचा 

दिलीप क्षीरसागर 
Sunday, 27 September 2020

कामेरी (जि. सांगली)- राज्यातील विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळेत काम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊन काळात तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 16 शिक्षकांनी पगाराअभावी आत्महत्या केल्या असून काळजीने 11 जणांनी हृदयविकाराच्या धक्‍क्‍यात प्राण गमावले आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या शिक्षकांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. आता तरी शासनाचे डोळे उघडतील का असा असा संतप्त सवाल शिक्षक बांधवांनी उपस्थित केला आहे. 

कामेरी (जि. सांगली)- राज्यातील विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळेत काम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊन काळात तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 16 शिक्षकांनी पगाराअभावी आत्महत्या केल्या असून काळजीने 11 जणांनी हृदयविकाराच्या धक्‍क्‍यात प्राण गमावले आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या शिक्षकांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. आता तरी शासनाचे डोळे उघडतील का असा असा संतप्त सवाल शिक्षक बांधवांनी उपस्थित केला आहे. 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित व काही अंशता अनुदानित शाळेत 60 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत. यातील काही शाळेतील शिक्षक 20 टक्के अनुदानास पात्र ठरलेत. त्यानंतर सन 2016 पासून वाढीव अनुदान मिळावे व विनाअनुदानित शाळांना अनुदान प्राप्त व्हावे यासाठी शिक्षक संघटना लढा देत आहेत. लॉकडाऊन काळात पगार नसल्याने 16 शिक्षकांनी आत्महत्या केल्या तर उर्वरित 11 जणांनी काळजीने हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने प्राण गमावले. 2000 साली कायम विनाअनुदानित या गोंडस नावाखाली मान्यता मिळालेल्या या शाळांतील जवळपास 60 हजारहुन जास्त शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न जैसे थे आहे.

26ऑगस्ट 2020 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या सर्वांच्या 345.93 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळणार होती. मात्र परत एकदा श्रेयवादाची माशी शिंकली अन सर्वसामान्य शिक्षकांच्या पदरी घोर निराशा पडली. खर तर यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेले 345 कोटी निधी वितरणाचे आदेश काढायचे सोडून विनाकारण त्रुटी समिती तयार करून शासन वेळकाढूपणा करत आहेत. मात्र या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 27 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. वीस वर्षापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती झगडत आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा लढा सुरू आहे. शासनाने आता अंत पाहू नये, अनुदान सुरू करून जीवदान द्यावे अशी त्यांची मागणी आहे. 

लॉक डाऊन काळातील मृत शिक्षक- 
संभाजी जाधव (जत), सुनील नायदे (जळगाव), सुहेल अन्सारी (धुळे), राजेश जाधव (जालना), जीवन डेंगळे (नागपूर), आशिष कांबळे (जालना), 
अनिल बडगुजर (जालना), श्रीमती योगिनी चव्हाण (नाशिक), आशिष मेश्राम (हटवांजरी), भागवत दुर्गाराम (विटा), एकनाथ सोळुंके (जालना), एम.पी.मानसिंग, गंगाराम चौधरी (डहाणू) दिलीप पाटील (जालना), सागर निळे (नंदुरबार), सुमेध राऊत (नांदेड), गिरीश मोरे (धुळे), मनोरंजन सोनटक्के (हिंगोली), सचिन नारनवरे (चंद्रपूर), ज्ञानेश्वर पल्लाळ (लासुर स्टेशन), मनिराम जाधव (साखरा), संजय राऊत (नागपूर), महेश खवास (भंडारा), मनोज गुजरकर (वर्धा), पकमोडे बाबू (हटवांजरी), दर्यावशिंग तुरकर (शांतिनिकेतन), सलीम सय्यद (पलूस) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 unsubsidized teachers die during lockdown.Suicide and heart attack due to anxiety.