सोलापूर ग्रामीणमध्ये सापडले 30 पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू तर 'या' गावात आढळले नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमधील रुग्णसंख्या 587 झाली 
  • ग्रामीणमधील एकूण 27 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • आतापर्यंत 241 रुग्णांची कोरोनाव मात; 319 रुग्णांवर सध्या सुरु आहेत उपचार 
  • 64 संशयितांचे अहवाल प्रलंबित; होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 778 व्यक्‍ती 
  • संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत रुग्णांच्या संपर्कातील एक हजार 95 व्यक्‍ती

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज (मंगळवारी) 30 रुग्णांची भर पडली असून आता रुग्णांची एकूण संख्या 587 झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 27 वर पोहचली आहे. आज पंढरपूर तालुक्‍यातील तीन, अक्‍कलकोट तालुक्‍यात सर्वाधिक 16, बार्शी तालुक्‍यात पाच, मोहोळ तालुक्‍यात एक, उत्तर सोलापुरात व दक्षिण सोलापुरात दोन आणि माढ्यात एका रुग्णांची भर पडली आहे. दक्षिण सोलापुरातील वडापूर येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

'या'ठिकाणी सापडले मंगळवारी नवे रुग्ण 
उत्तर सोलापुरातील कारंबा, तिऱ्हे येथे प्रत्येही एक, दक्षिण सोलापुरातील कुंभारीत दोन, बार्शीतील मंगळवार पेठ, व्हनकळसे प्लॉट, वैराग येथे प्रत्येकी एक तर साकत पिंपरीत दोन रुग्ण आढळले आहेत. मोहोळ तालुक्‍यातील खवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर अक्‍कलकोटमधील फत्तेसिंह चौकात सात, जंगी प्लॉटमध्ये पाच, बुधवार पेठ, चपळगाव, नागनहळ्ळी, बोरगाव येथे प्रत्येकी एक तर पंढरपुरातील गोविंदपुरा, जुनी कोळी गल्ली, गुरसाळे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच माढा तालुक्‍यातील भोसरे येथे एक रुग्ण सापडल आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 
अक्‍कलकोट (116), बार्शी (110), करमाळा (6), माढा (12), माळशिरस (6), मंगळवेढा (1), मोहोळ (29), उत्तर सोलापूर (61), पंढरपूर (32), सांगोला (4) आणि दक्षिण सोलापुरात 210 असे एकूण 587 रुग्ण आतापर्यंत ग्रामीण भागात आढळले आहेत. 

 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमधील रुग्णसंख्या 587 झाली 
  • ग्रामीणमधील एकूण 27 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • आतापर्यंत 241 रुग्णांची कोरोनाव मात; 319 रुग्णांवर सध्या सुरु आहेत उपचार 
  • 64 संशयितांचे अहवाल प्रलंबित; होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 778 व्यक्‍ती 
  • संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत रुग्णांच्या संपर्कातील एक हजार 95 व्यक्‍ती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 positive found in rural Solapur