30 वर्षे बंद बिरोबा पालखी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

अंकलखोप (जि. सांगली ) येथे बिरोबा मंदिर रस्ता 30 वर्षे बंद होता. अतिक्रमणे दूर करून रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. 

अंकलखोप (जि. सांगली ) : येथे बिरोबा मंदिर रस्ता 30 वर्षे बंद होता. अतिक्रमणे दूर करून रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. रस्ता बंद नसल्याने लोकांचे हाल सुरू होते. 100 वर्षे श्री बिरोबाची पालखी विठ्ठलनगरहून श्री सिध्देश्वर मंदिरात येथूनच येई. रस्त्याला बिरोबा वाट अशी ओळख आहे. 

रस्त्यावरून महिला, मजुर, वैरण आणण्यास लोक जात. अतिक्रमणाने वर्दळ थांबली. गाडीवाटही बंद झाली. उरली पाऊलवाट. काहींनी शेती करणे सोडले. पाऊलवाटसुद्धा बंद झाली. वाटेचा मागमूस उरला नव्हता. गैरफायदा घेत काहींनी अतिक्रमणे केली. वहिवाट बंद झाली. रस्ता होता तिथे काटेरी झुडपे वाढली. जंगलच तयार झाले होते. 

ग्रामसभेत रस्ता खुला करण्याचा ठराव होई. कारवाई मात्र नव्हती. श्री तांबजाई देवीचे मंदिर आहे. शेतकरी देवीला नैवेद्य देत. लॉकडाऊनमुळे रस्ते बंद झाले. हा एकच मार्ग सुरू असल्यामुळे शेतात जाणे व चारा घेऊन येणे गैरसोयीचे झाले.

त्यावर पर्यायासाठी 30 वर्षे बंद असलेला रस्ता खुला करण्याचा विचार पत्रकार महेश चौगुले, जि. प. सदस्य नितीन नवले, सरपंच अनिल विभुते, अविनाश सूर्यवंशी, अमेय भोसले, भालचंद्र चौगुले, प्रमोद जाधव, शिवलिंग कृष्णा चौगुले, नंदकुमार चौगुले, लक्ष्मण सुर्यवंशी, बाळासो सूर्यवंशी, शुभम सुर्यवंशीसह शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अतिक्रमणे काढली. मार्ग खुला झाल्याने सिलेंडर आणणे सोयीचे झाले. 2-3 किलोमीटरचा फेरा वाचला. लॉकडाऊन काळात चांगला उपक्रम राबवून रस्ता खुला करणा-यांचे ग्रामस्थांनी कौतक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 years closed road opened in Ankakop