
सांगली : मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने तिघा भामट्यांनी सांगलीतील निवृत्ताची तब्बल ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालवधीत घडली. किरण अनंत कुलकर्णी (वय ७१, गौरीशंकर, नागराज कॉलनी, विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित रवी जाधव, निखिल श्रीवास्तव, हेमराज कोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.