अबब ! ‘३५०’ चे खताचे पोते १२०० रुपयांना; काय आहे प्रकार ?

350 Rs Fertilizer Bag Sale At 1200 Fraud In Kolhapur
350 Rs Fertilizer Bag Sale At 1200 Fraud In Kolhapur

कोल्हापूर - महाग रासायनिक खताच्या पोत्यात कमी किमतीचे खत मिळसून विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी ‘सकाळ’कडे केली. बुधवारी (ता. ११) तक्रार आल्यानंतर ‘सकाळ’च्या  टीमने संबंधित शेतकऱ्यांना घेऊन कसबा बावडा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याकडे गेली. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या खताचा नमुना त्यांना दाखवला. 

या वेळी प्रतिपोते १२०० रुपयांना विक्री केलेले ‘डीएपी’ म्हणून असणारे खत ‘डीएपी’ नसून, त्याच्यासारखे दिसणारे ३५० ते ४०० रुपये किमतीचे दुसरेच खत असल्याचा अंदाज श्री. वाकुरे यांनी व्यक्त करत खतविक्री करणाऱ्या संस्थेवर छापा टाकण्याचा निर्णय घेतला.

डीएपी’ नसल्याचा संशय

खतांच्या किमती गगनाला भिडत आहेत. वाढलेल्या किमतीमुळे जेथे ‘डीएपी’ खतांची पाच पोती आवश्‍यक असतात, तेथे एक किंवा दोनच पोती खरेदी केली जात आहे. अशातच पाडळी खुर्द येथे असणाऱ्या एका संघाकडून संस्थेला पुरवठा केलेल्या कमी किमतीचे खत ‘डीएपी’ खत म्हणून विक्री केली जात असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी ‘सकाळ’कडे केली. कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयात सायंकाळी ६.१५ वाजता शेतकऱ्यांनी आणलेल्या खतांची प्राथमिक तपासणी केली. यात ‘डीएपी’ म्हणून विक्री झालेले खत ‘डीएपी’ नसल्याचा संशय आला. तक्रारदार शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेची आणि खतविक्री करणाऱ्या संघाची तपासणी करावी, अशी विनंती केली. यावर, प्रकरण गंभीर आहे, उद्या नाही तर आज आणि आताच छापा टाकू, असे म्हणत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाकुरे यांनी तत्परता दाखवून जिल्हा परिषदेचेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक आर. एस. शेळके आणि त्यांची टीम घेऊन पाडळी खुर्द (ता. करवीर) गाठले. याच गावात असणाऱ्या एका संस्थेत सायंकाळी ७.३० च्या दरम्यान वाकुरे यांनी टीमसह छापा टाकला. 

संघावरही रात्री ८.२० वाजता कारवाई

यावेळी, संस्थेचे गोदाम बंद होते. श्री. वाकुरे यांनी गोदामाच्या व्यवस्थापकांना फोन करून बोलावून घेतले आणि चौकशी केली. ज्या ‘डीएपी’ खताबद्दल तक्रार होती, त्याची सात पोती शिल्लक होती. याच पोत्यात कमी किमतीचे खत भरल्याचा संशयही श्री. वाकुरे यांनी व्यक्त केला. त्यानंतर संस्थेचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांपुढेच ‘डीएपी’ म्हणून असणाऱ्या पोत्यातील खतांसह इतर खतांचे नमुने घेतले. त्यानंतर संस्थेने ज्या खतविक्री संघातून ‘डीएपी’ची पोती खरेदी केली होती, त्या संघावरही रात्री ८.२० वाजता धडक दिली. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि त्यांचे काही अधिकारी सायंकाळी साडेसातपासूनच लक्ष ठेवून होते. श्री. वाकुरे आल्यानंतर तिथे सुरक्षा रक्षकांशिवाय दुसरे जबाबदार कोणीही नव्हते. याचवेळी गोदामाच्या सुरक्षा रक्षकांना फोन लावून अधिकारी आल्याची माहिती दिली; पण पाडळी खुर्दपासून २० किलोमीटरवर असणारे गोदाम रक्षक येण्यास अडचण असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे श्री. वाकुरे अधिकाऱ्यांसमवेत कार्यालयाकडे रवाना झाले. 

डीएपी नसल्याची शंका

कमी किमतीचे खत डीएपी म्हणून विक्री होत असल्याची तक्रार आली होती. संबंधित संस्था व संघाची चौकशी केली आहे. यात जे खत डीएपी म्हणून विक्री केले जात आहे, त्याचे नमुने घेतले आहेत. त्याची प्रयोगशाळेत पडताळणी केली जात आहे. ‘डीएपी’ खत ओळखण्यासाठी चाचणी घेतली आहे. ज्या संस्थेत डीएपी म्हणून खत आहे, ते डीएपी नसल्याची शंका आहे. अहवाल आल्यानंतर सत्यता समजेल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com