esakal | दिलासादायक : बेळगावात 37 पत्रकारांचा अहवाल निगेटिव्ह... 
sakal

बोलून बातमी शोधा

37 journalists corona test report negative

जिल्ह्यातील 37 प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे अहवाल आज (ता.7) निगेटिव्ह आले. त्यामुळे दिलासा मिळाला.

दिलासादायक : बेळगावात 37 पत्रकारांचा अहवाल निगेटिव्ह... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील 37 प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे अहवाल आज (ता.7) निगेटिव्ह आले. त्यामुळे दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात आणि दोन दिवसांपूर्वी मिळून 37 जणांचे नमुने घेण्यात आले होते. प्रयोगशाळेला पाठविले होते. तपशिल आज उपलब्ध झाला. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली. 

हेही वाचा- चिंता वाढली : सिंधुदुर्गातील त्या 20 मुलांचे वैद्यकीय परीक्षेचे भवितव्य अधांतरीच.....

देशातील विविध राज्यात पत्रकार, पोलिस, डॉक्‍टर आणि अधिकाऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे वृत्त आहे. विषाणूने काहींचा मृत्यू झाला आहे. काहींना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. खासकरून मुंबईत पंन्नासहून अधिक पत्रकारांना कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा धागा धरून कर्नाटकात माहिती अणि प्रसिध्दी खाते आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्त वैद्यकीय चाचणी आयोजित केली. वृत्तवाहिन्या आणि मुद्रित प्रतिनिधी मिळून 37 जणांनी चाचणी झाली. प्रयोगशाळेला द्रव (स्वॅब) पाठविले होते. त्यापैकी सर्वच म्हणजे 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- गांभीर्य नाहीच : मंडणगडात कामानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांनी गावी जाण्यास दिले अधिक महत्व ...

माध्यम प्रतिनिधींचे जीवन खूप धगधगीचे. छायाचित्रण, वार्तांकन आणि व्हिडिओ शुटिंगच्या दरम्यान जनतेशी संपर्क येतो. त्याद्वारे कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी माहिती आणि प्रसिध्द खात्याने विशेष चाचणी शिबिर आयोजित केली होती. शासकीय विश्रामगृहात चाचणी चालली. पण, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे माध्यम प्रतिनिधीत विषाणूचा फैलाव झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा दावा जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी केला आहे. 
 

loading image