esakal | थकबाकी ४० लाख; ठेकेदाराचा अंत्यसंस्कार करण्यास नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

थकबाकी ४० लाख; ठेकेदाराचा अंत्यसंस्कार करण्यास नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज : जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचे सहा महिन्यातील सुमारे ४० लाख रुपयांचे बिल जिल्हा प्रशासनाकडून दिले गेले नसल्याने ठेकेदाराने आज सकाळी ग्रामीण भागातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. बिलाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेकडे आहे. महापालिकेने ठेकेदार नेमला आहे . लाकूड पुरवणे, मृतदेहाची हाताळणी करणे असे दोन वेगवेगळे भाग केलेत. दोन स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केले आहेत. महापालिका क्षेत्रातील मृतदेहांची हाताळणी करणाऱ्या आणि त्यासाठी लाकूड पुरवठा करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांची बिले ठेकेदारांना मिळाली आहेत. ग्रामीण भागातील मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराची पैसे देण्यास मात्र महापालिकेने असमर्थता दर्शवली. अंत्यसंस्कार हा संवेदनशील विषय असल्याने आपण हे पैसे नातेवाइकांकडे मागू शकत नाही. बहुसंख्य नातेवाईक स्मशानभूमीकडे फिरकतही नाहीत. नाईलाजाने अंत्यसंस्कार करणे भाग पडते.

हेही वाचा: Akola: आता ग्रामीण भागातही ‘हिरोपंती’ करणे भोवणार!

लाकूड पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास ग्रामीण भागातील मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी दिलेल्या लाकडाचे पैसेच मिळाले नसल्याने ठेकेदार भीमराव उदगावे यांनी आज सकाळी आष्टा, सुभाषनगर(मालगाव रस्ता) येथील दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. दोन्ही मृतांच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेताच उदगावे यांना अंत्यसंस्कार करणे भाग पडले.

महापालिकेने दिलेल्या यादीनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे अनुदानाचा प्रस्ताव पाठवला आहे. मध्यंतरी यापैकी काही रक्कम महापालिकेस दिली आहे. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या अंत्यसंस्कारांसाठी अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने स्वतः पाठपुरावा करीत आहोत.

-समीर शिंगटे प्रांताधिकारी, मिरज

हेही वाचा: पुणे: पीएमआरडीएच्या डीपीत महापालिकेने सुचविले बदल

कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरवण्याचे काम सुरू केल्यापासुन ग्रामीण भागातील मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा एक रुपया मिळालेला नाही. महापालिकेकडून मिळालेल्या बिलातुन लाकडे खरेदीची थकबाकी भागवली. ग्रामीण भागातील मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराची थकबाकी ४० लाखापर्यंत गेल्याने आर्थिक अडचणीत आलोय. पतसंस्थांसह उसनवारी करून पैसे भागवले. सगळे आवाक्याबाहेर गेल्याने काही दिवसात आर्थिक अडचणीसाठी काम बंद करावे लागेल.

loading image
go to top