सोलापूर : बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सोलापूर : बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बार्शी : शहरातील अलिपूर रस्त्यावर असणाऱ्या ज्ञानेश्वर मठाजवळ एकत्र कुटुंबात राहणाऱ्या एकाने स्वतःचे कुटुंब संपवले असून, स्वतः व पत्नीने गळफास घेतला व मुलांना विष पाजून त्यांची जीवनयात्रा संपवली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भैरवनाथ शिवाजी कोकाटे (४०), मनीषा भैरवनाथ कोकाटे (३७), असे गळफास घेतलेल्या घेतलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. नववीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रशांत कोकाटे (१५), पाचवीत शिक्षण घेणारी प्रतिक्षा कोकाटे (११) यांचा विषप्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे.

भैरवनाथ कोकाटे हे जागा, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे बंधू येथील एका हॉटेलमध्ये वस्ताद म्हणून काम करतात. दोघे भाऊ एकत्र राहतात. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर एकच बेडरुम असून, दुपारी चारच्या दरम्यान त्या रुमला आतून कडी लावून घेऊन पती-पत्नीने एकाच फॅनला दोघांनी दोरीने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले.

रुममध्ये शेजारीच मोठा लोखंडीस्टूलचा वापर केला होता. प्रशांत व प्रतिक्षा दोन्ही मुले कॉटवर शांत झोपली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना विष दिल्याचा संशय येत होता. पोलिस निरीक्षक भागवत मुंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन येडगे यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. मृतदेह खाली घेऊन अंतिम क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com